“पुरंदरचे कोहिनूर” अजित उत्तमराव गोळे. एक रिक्षा चालक ते हॉटेल “सवाई एक्झिक्युटिव्ह” चे मालक ःः (शब्दांकन :-कवी राजेंद्र सोनवणे )

Share now


Advertisement

     पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथे राहणारे अतिशय गरीब कुटुंबातुन पुढे आलेले अजित गोळे हे काही काळ रिक्षा चालक म्हणून काम करीत होते. अत्यंत खडतर परिस्थितीतून युवा उद्योजक म्हणून त्याची ओळख आहे. या पुरंदरच्या कोहिनूर हिरा या विषयावर कवि राजेंद्र सोनवणे यांनी उलगडलेला जिवन पट कवि राजेंद्र सोनवणे यांनी केलेला प्रयत्न

Advertisement


दिवे घाट संपला की, आपला पुरंदर मध्ये प्रवेश होतो. पुरंदरची गोड प्रसन्न हवा आपले स्वागत करते. शहरातील धुरकट हवेने आलेली मरगळ एका क्षणात नाहीशी होते.
आजूबाजूच्या सीताफळ अंजीराच्या बागा पाहून मन उल्हासित झाले नाहीतर नवलच.अशा वातावरणातच काही सेकंदाच्या अंतरावर “हॉटेल सवाई”आपले स्वागत करते आणि तितक्याच आत्मीयतेने,आस्थेने स्वागत करण्यासाठी चेहऱ्यावर गोड हास्य घेऊन एक उत्साही तरुण आपले लक्ष वेधून घेतो ते नाव म्हणजे अजित गोळे अर्थातच ते सवाई EXECUTIVE चे मालक असतात..

Advertisement

 मित्रांनो तुम्हीं म्हणताल यात नक्की विशेष काय आहे.तर नक्कीच विशेष आहे. वडिलांनी निर्माण केलेल्या वेल फर्निश काउंटरवर आयते बसणे आणि हे काउंटर स्वतः निर्माण करून त्या वर उभे राहणे यात नक्कीच फरक असतो. याला फक्त एकाच शब्दात व्यक्त होता येईल तो शब्द म्हणजे “स्वकर्तुत्व” आणि केवळ वयाच्या तिशीच्या आत या शब्दाचा भावार्थ अजित यांनी सार्थ करून दाखवला आहे…

Advertisement

गावात एकटे असलेले घर, वडील तश्या अर्थाने प्रतिष्ठा नसलेल्या गवंडी काम या पेशात एका गवंड्याचे पोरं या नजरेने पाहणारे आसपासचे बागायतदार. आई बदामबाई गोळे रस्त्यावर भाजी पाला विकायच्या अशा परिस्थितीत  मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतले व आजित याचे शिक्षण पुर्ण झाल्या नंतर रिक्षा चालक म्हणून काम सुरु केले. ते करत आसताना आनेक वेळा फुटपथ वर झोपण्याचा प्रसंग ओढवला पण ते माघे हाटले नाहीत. आई ची जिद्द चिकाटी होती की मुलांनी काही तरी करून दाखवावे त्यातुनच प्रेरणा घेत आईचे हॉटेल उभे करण्याचे स्वप्न अजित गोळे यांनी पुर्ण केले. आपले जीवन ध्येय बनवणे आणि ते सत्यात उतरवणे या साठी अजित यांना काय काय पापड बेलावे लागले असतील हे त्यांच्या जीवलाच माहीत..आणि हो मित्रांनो यशाची शिखरे म्हणूनच अशी सहज साध्य होत नसतात.
परिस्थितीचा चिखल ना उमेद होता जे पार करतात त्यांना नक्कीच चांगली वाट सापडते. पण त्या साठी मात्र तुमची ध्येये पक्की असावी लागतात… 

Advertisement


आई वडिलांवर असीम श्रद्धा, प्रेम, भक्ती आणि त्यांच्या आशिर्वादाचे भांडवल घेऊन हा तरुण जीवनाच्या रणांगणात उतरला.. जगनिंदेची पर्वा केली नाही, रस्त्यावर भाजी विकताना मान शरमेने खाली जाऊ दिली नाही. त्या साठी आईचे शब्द काळजावर कोरून घेतले. आपण आपल्या पोटासाठी कष्ट करून भाजी विकतो आहोत चोऱ्या माऱ्या करीत नाही. चोऱ्या माऱ्या करून जे माड्या हवेल्या बांधीत असतील त्यांना त्यांच्या  त्या लख लाभ असोत…

Advertisement

अजित गोळे यांचे बालपण तसे परिस्थितीत करपून गेले. मौजमजा करण्याच्या वयात त्यांना घरच्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी फक्त मजुरा सारखे ढोर कष्ट उपसावे लागले..हा त्यांचा संघर्ष आजही चालू आहे फक्त त्याचे स्वरूप बदललं आहे. अजित गोळे आणि त्यांच्या आईच्या अथक कष्टाचे चीज मात्र एका प्रसंगाने नक्कीच झाले तो प्रसंग आपल्या पुरंदरच्या माता भगिनींना देखील फार मोठी प्रेरणा देणारा आहे.अजित यांच्या मातोश्री बदामबाई यांचा गौरव भारताच्या माजी राष्ट्रपती आदरणीय प्रतिभा ताई पाटील यांच्या हस्ते झाला तो क्षण.. हा गौरवाचा क्षण गोळे परिवारा साठी तर महत्वाचा आहेच पण उभ्या पुरंदर साठी देखील तितकाच गौरवाचा आहे.अजित गोळे यांनी पैसा जपण्या पेक्षा माणसे जपण्यावर भर दिला त्यांच्या नजरेत गरीब श्रीमंत असा भेद मला तरी दिसलाच नाही त्यांच्या दृष्टीने माणूस महत्वाचा आहे.

Advertisement

ज्यांच्या जवळ जीवाला जीव देणारी माणसं असतात त्यांच्या साठी धन,ऐश्वर्य या बाबी दुय्यम ठरतात.अजित गोळे यांनी आपल्या मधुर वाणीने अशी जीवाला जीव देणारी माणसे जपण्यात कोणतीही कसर ठेवलेली दिसत नाही.

Advertisement

माझ्या बरोबर माझ्या पुरंदरच्या प्रत्येक तरुणाने गरिबीची भीती न बाळगता पुढे जावे अशी त्यांची निर्मळ भावना त्यांना नक्कीच इतरांपेक्षा वेगळे तेज बहाल करते. पुरंदरचे आदरणीय व्यक्तिमत्त्व माजी आमदार,महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव यांच्या विचारांचा प्रभाव आणि आदर्श त्यांनी तितक्याच आत्मीयतेने जपला आहे. पुरंदरच्या परिस्थीने गांजलेल्या,तरुणांनी नक्कीच अजित गोळे यांचा आदर्श डोळ्या सामोर ठेवावा. राहत इंदोरी आपल्या एका शेरात म्हणतात..

Advertisement


“शाखोंसे टूट जाये वो पत्ते नही है हम।कोई तुफान से कह देअपनी औकात मे रहे।

Advertisement


परिस्थितीची वादळे येतच असतात पण जीवनाच्या रणांगणात जो लढत राहतो त्यालाच वीर म्हणतात. मित्रांनो, कधी हॉटेल सवाईला आलाच तर आमच्या पुरंदरचे कोहिनूर अजित गोळे यांना नक्की भेटा मला खात्री आहे त्यांच्याकडून तुम्हांला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळेल.आज हे माझे हे सदर अजित गोळे व त्यांच्या मातोश्री बदामताई गोळे,त्यांचे वडील उत्तमराव गोळे तसेच त्यांचे जेष्ठ बंधू बाबूशेठ यांना समर्पित करताना मलाही मनस्वी आनंद होत आहे.

Advertisement


(शब्दांकन :-कवी राजेंद्र सोनवणे९८८१६११३७८)

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *