दि १३ रोजी खासदार सुप्रिया सुळे पुरंदर दौऱ्यावर
सासवड (प्रतिनिधी) बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर हेे पुरंदर मधील जिल्हा परिषद गटनिहाय मिळावे घेणार असून या मध्ये सोमवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी पुरंदर च्या दौऱ्यावर येत आहेत.
यामध्ये दिवे गराडे जिल्हा परिषद गटासाठी सकाळी ९:३० ते १२ रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय ढुमेवाडी, वीर भिवडी जिल्हा परिषद गटासाठी १२ ते ३ श्री क्षेत्र वीर देवस्थान येथील श्रीनाथ मंगल कार्यालय वीर, तर निरा कोळविहिरे गटासाठी राधा कृष्ण मंगल कार्यालय निरा येथे ३:३० ते ६ असा दौरा आसुन याचे आयोजन पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, महिला तालुकाध्यक्ष गौरी कुंजीर, युवक तालुकाध्यक्ष पुष्कराज जाधव, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदेश पवाार यांनी केले असल्याचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे यांनी सांगितले.