उद्या मुंबईत हिवरे व चांंबळी येथील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांची बैठक

Share now

सासवड (प्रतिनिधी)

Advertisement

चांबळी (ता. पुरंदर) येथे ११ सप्टेंबर रोजी आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हिवरे-चांबळी रिंग रोड बाधित शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली. मुंबई येथे १३ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार आमोल कोल्हे, व सर्व आधिकारी याच्या सोबत होणाऱ्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे आमदार संजय जगताप सांगितले. यामुळे उपस्थित शेतकऱ्यांना समाधान वाटले.

Advertisement

यावेळी आमदार संजय जगताप यांना प्रस्थापित रिंग रोड हा बाजूने जावा व बाधित शेतकऱ्यांच्या जमीनी वाचव्यात यासाठीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी रिंगरोड विरोधी कृती समितीचे अध्यक्ष कान्हू कटके, उपाध्यक्ष दत्तात्रय शेंडकर, नाना शेंडकर, ज्ञानोबा शेंडकर, प्रकाश भालेराव, शांताराम दळवी, आण्णा राजपुरे, खजिंदर जालिंदर शेंडकर, मधुसूदन शेंडकर, विश्वास शेंडकर, शिवाजी शेंडकर, कुमार कटके, विलास कटके, हनुमंत कटके, एकनाथ कटके, संभाजी कटके, किशोर कटके, रामदास कटके, राजू गायकवाड, सोपान शेंडकर, रामदास शेंडकर आदी उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक कान्हू कटके यांनी केले. आभार प्रकाश भालेराव यांनी मानले.सासवड

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *