भारतीय जैन संघटना व आरोग्य विभागाच्या वतिने महा लसिकरण
.
पुरंदर(प्रतिनिधी अक्षय कोलते)भारतीय जैन संघटना व आरोग्य विभागाच्या संयुक्त विध्येमाने पुरंदर तालुक्यातील दिवे ग्रामपंचायत ,सोनोरी ग्रामपंचायत व झेंडेवाडी ग्रामपंचायत या तीन ग्रामपंचायतींच्या सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता भारतीय जैन संघटना व जिल्हा परिषद पुणे कोविड मुक्त गाव अभियान सबंध पुणे जिल्ह्यात राबवत आहे.भारतीय जैन संघटनेच्या मदतीने पुरंदर तालुक्यातील वाल्हे ,आडाचीवाडी, मांडकी,त्या नंतर दौंडज व पिंपरे खुर्द ही गावे लसीकरण करण्यात आली.व आता दिवे,झेंडेवाडी व सोनोरी या गावातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
कोरोना लसीकरणाला नागरीकांनी उस्फुर्त प्रतिसाद दर्शवला व 1620 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.या लसीकरणाला मा श्री बाबाराजे जाधवराव यांनी भेट दिली व भारतीय जैन संघटनेच्या कामाचे कौतुक केले.कोरोनाचे सर्व नियम पाळून हे लसीकरण व्यवस्थित पार पडले.
यावेळी दिवे गावचे सरपंच अमित झेंडे,सोनोरी गावचे सरपंच नितीन काळे,झेंडेवाडी च्या सरपंच सौ.पूनम झेंडे यांनी आपापल्या गावातील लोकांना लसीकरण करण्यास मोलाचे मार्गदर्शन केले.डॉ विवेक आबनावे, सर्व आरोग्य कर्मचारी व भारतीय जैन संघटनेचे रमेश भाऊ नवलाखा,मा. श्री.मधुकर जगताप सर व तालुका समन्वयक अक्षय कोलते उपस्थित होते.