पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत सासवड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन तक्रार निवारण दिनाच्या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग होण्याचे अण्णासाहेब घोलप यांचे आव्हान

Share now


सासवड (प्रतिनिधी) सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांनाच्या आडचणी सोडवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख हे गुरुवार दिनांक ९/९/२०२१ रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ५  वाजे पर्यंत तक्रार निवारण दिनाचे आयोजन करून तक्रारदार यांच्या तक्रारीचे ताबडतोब निवारण करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन यांना आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे सासवड पोलीस स्टेशनला तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

Advertisement

          सासवड पोलीस स्टेशनला प्राप्त झालेल्या तक्रारी संबंधित अर्जदार गैर अर्जदार यांना समक्ष बोलावून त्यांच्या तक्रार अर्जातील तक्रारीवर त्वरित निर्णय घेऊन, पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सर्व तक्रारदार यांना त्यांचे मोबाईल फोनवरून फोन करून तसेच मेसेज करून माहिती देण्यात आलेली आहे. 

Advertisement

    संबंधित तक्रारदार यांनी गुरुवारी दिनांक ९ रोजी सकाळी स१०:३० वाजता न चुकता उपस्थित राहावे. सदर तक्रार निवारण दिनास उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील  व अन्य वरिष्ठ अधिकारी देखील भेट देणार आहेत. 

Advertisement

      सासवड पोलिस स्टेशन मधील सर्व अधिकारी बीट अंमलदार व इतर कर्मचारी या तक्रार निवारण दिनास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे तक्रारदाराच्या तक्रारीचे त्याच दिवशी जागच्याजागी निराकरण केले जाणार आहे . 

Advertisement

     जास्तीत जास्त तक्रारदार यांनी या दिवशी उपस्थित राहून आपल्या तक्रारीचा ताबडतोब निपटारा करून घ्यावा .असे आवाहन सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  आण्णासाहेब घोलप यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *