सात गावांचा पुरंदर विमानतळाला कडाडून विरोध पीएमआरडीएचे अधिकारी यांना दिले निवेदन

Share now


सासवड (प्रतिनिधी) ः खानवडी, पारगाव मेमाणे,  एखतपूर-मुंजवडी, कुंभारवळण, उदाचीवाडी  व वनपुरी या सात गावातील सरपंचांनी आज तहसील कचेरीत पीएमआरडीएचे कनिष्ठ अभियंता अमित हासते यांना लेखी निवेदन देत विमानतळास ठाम विरोध दर्शविला. तसेच पीएमआरडीएने टाकलेल्या आरक्षणावर सातही गावातील सरपंचांनी हरकती नोंदवल्या आहेत.

Advertisement

           पीएमआरडीएने २ ऑगस्ट पासून नव्याने समाविष्ट गावातील झोन आरक्षणावर हरकती मागवल्या आहेत. सदर गट नंबरवर विविध आरक्षणे टाकली आहे. परंतु या सात गावावर विमानतळ विकास प्राधिकरण या कंपनीचे (MADC) कोणताही आधार नसताना आरक्षण टाकले आहे. येथील बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचा व ग्रामपंचायतींचा विमानतळास जमीन देण्यास ठाम विरोध आहे. पीएमआरडीएने कसलाही अधिकार नसताना परस्पर एम.ए.डी.सी हे आरक्षण टाकले आहे. यासाठी सात गावातील शेतकऱ्यांनी लेखी हरकती नोंदवल्या आहे. सरपंच व त्यांच्या ग्रामपंचायतीने सर्व सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी यास कडाडून विरोध केलेला आहे. आज या सातही गावातील सरपंचांनी ग्रामपंचायतीच्या ठरावासह शेतकऱ्यांचाही हरकती नोंदवल्या.             पुरंदर विमानतळ याच्या संबधी विजय शिवतारे यांनी पवारसाहेबांना स्मरण पत्र दिल्याची बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. यामुळे या सात गावातील संरपंचांनी आपला तातडीने निर्णय घेऊन त्यांनी आपल्या हरकती नोंदविल्या 

Advertisement

       सदर वेळी वनपुरीचे सरपंच नामदेव कुंभारकर, पारगावच्या सरपंच प्रियंका नीतीन मेमणे, खानवडीच्या सरपंच स्वप्नाली होले, उदाच्यावाडीचे सरपंच संतोष कुंभारकर, एखतपुर मुंजवडीचे सरपंच कृष्णा झुरुंगे, कुंभारवळणच्या सरपंच आश्विनी कुंभारकर उपस्थित होते. तसेच आत्तापर्यंत गावनिहाय हरकती पि.एम.आर.डि.ए कडे खालील प्रमाणे पारगाव ५२२, खानवडी  ९८, एखतपुर-मुंजवडी ७८, कुंभारवळण १५९, उदाचीवाडी ११०, वनपुरी २५० दाखल केल्या आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *