पुरंदर मधील शेतकऱ्यांनी रिंग रोडच्या मोजणीचे काम पाडले बंद

Share now

सासवड (प्रतिनिधी) चांबळी व हिवरे येथील शेतकऱ्यांनी रिंग रोडच्या सर्वेला विरोध करीत डोंगराच्या कडेने सन 2013 पाली जो सर्वे झाला आहे या ठिकाणावरून सर्वे करावा सदरच्या बागायती जमिनीमधून जाणार्या या रिंग रोडला आमचा पूर्णपणे विरोध आहे. अशा आशयाचे देखील अधिकाऱ्यांना निवेदने व हरकती दिलेल्या आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी डोंगराच्या कडेने रिंग रोडचा सर्वे करावा तिकडेही आमच्या जमिनी जात आहेत. आशी भूमिका शेतकर्‍यांनी घेतली होती.

Advertisement

          रिंग रोडच्या मोजणी साठी सकाळी चांबळी (ता. पुरंदर) येथे भुमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी मोजणी साठी आले होते. परंतु शेतकऱ्यांचा तीव्र विरोध पाहता कर्मचारी हे मोजणीच्या ठिकाणच्या क्षेत्रापर्यंत पोचू शकले नाहीत. त्यानंतर मोजणी अधिकारी यांनी  उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना घटनास्थळा बाबत माहिती दिल्यानंतर या ठिकाणी उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड व  तहसिलदार रूपाली सरनोबत हे दाखल झाले. परंतु शेतकऱ्यांच्या प्रचंड विरोध असल्याने आज मोजणीचे काम बंद ठेवण्यात आले.                उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड म्हणाले की, सदरचा रिंग रोडच्या नकाशा मध्ये बदल करण्याचे अधिकार हे मला नाही. त्यामुळे मी ते करू शकत नाही. ज्या ठिकाणावरून रिंग रोड जाणार आहे. त्या ठिकाणचा सर्वे केला जाईल. या नकाशा मध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केले जाणार नाहीत. ते बदल करावयाचे असल्यास एम. एस. आर. डी. सी. ने बदल करावेत असे शेतकऱ्यांना सांगितले. 

Advertisement

      यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचेेेे हंसराज मनाळे,  भुमीअभिलेख कार्यालयाच्या भुमाकर अधिकारी प्रीतम बनकर, मंडल अधिकारी राजाराम भामे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता रविकांत देशमुख, सहाय्यक अभियंत्रीकी नितीन बागुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने, सुप्रिया दुरंदे, आदी उपस्थित होते. 

Advertisement

      शेतकऱ्यांची आजची परिस्थिती वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांना सांगितली जाईल. व याबाबत वरिष्ठ असणारे श्री पाटील हे शेतकर्‍यांशी चर्चा करतील त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असे तहसिलदार रूपाली सरनोबत यांनी यावेळी बोलताना सांगितले
         या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी शांताराम दळवी, धोंडीबा दळवी, रामचंद्र दळवी, लक्ष्मण दळवी, सुखदेव दळवी, अरुण दळवी, शरद दळवी, हनुमंत दळवी, शिवाजी दळवी, विलास दळवी, संदीप दळवी, मस्कु दळवी, जी. एस. शेंडकर, धर्माजी गायकवाड, कान्हु कटके, अॅड. ज्ञानोबा शेंडकर. शब्बीर शेख, आदी शेतकरी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *