पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी येथे अपघातात एक ठार
सासवड (प्रतिनिधी) पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी येथे दुचाकी व पिकप गंभीर अपघात होऊन दुचाकीचालक ठार झाला असल्याची घटना उदाचीवडी येथील पत्रावळी कंपनी नजिक झाला असून याबाबत गणेश बाळू सोनवणे (वय ४६ वर्षे) रा. सोनोरी ता. पुरंदर यांनी सासवड पोलिस स्टेशनला आरोपी सतिश वाघमंचर (रा. मयूर पार्क औरंगाबाद शहर) याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमूद आरोपी यांनी आपले ताब्यातील पिकप गाडी चालक सतिश वाघमंचर (रा. मयूर पार्क औरंगाबाद शहर) नंबर MH 20 EG 5675 हे रस्त्याच्या नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून समोरुन येणारे मोटरसायकल नंबर MH 42 D 9448 हिस ठोस मारून अपघात करून अपघातामध्ये नंदू बाळू सोनवणे यास गंभीर दुखापत करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे. पुढील तपास सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एल. माने करीत आहेत