पुरंदरच्या शिवसेनेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जोडे मारुन केले आंदोलन तर नारायण राणेच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपाच्या वतिने उपोषण सुरू
सासवड (प्रतिनिधी अमृत भांडवलकर) ः राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात पुरंदर शिवसेना आक्रमक होऊन त्यांनी राणे यांच्या प्रतिमे समोर ” कोंबड्या ” ठेवून आणि त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून जोरदार निषेध केला.
सासवड ( ता. पुरंदर ) येथील नगरपालिकेचे समोर पुरंदरच्या शिवसेनेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जोडे मारुन आंदोलन केले. तर पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा नेते बाबाराजे जाधवराव व तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सुटका होत नाही तोपर्यंत उपोषणाला सुरुवात केली आहे.
यावेळी पुरंदर पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, उपजिल्हाप्रमुख रमेश जाधव, नगरसेवक सचिन भोंगळे, डॉ. राजेश दळवी, हरिभाऊ लोळे, राजाभाऊ झेंडे, अभिजित जगताप, मंदार गिरमे, युवा नेते सुरज जगताप, प्रकाश ताटे, प्रशांत वांढेकर, समीर जाधव, अजित चौखंडे, विद्यार्थी सेनेचे वैभव कोलते, मंगेश भिंताडे, सचिन देशमुख, प्रवीण लोळे, कुणाल जगताप, आदेश जाधव, अविनाश बडदे, धीरज राऊत, ओंकार जगताप, राजाभाऊ जगताप आदी उपस्थित होते. यावेळी सासवड पोलीस ठाण्यात निवेदन देवून नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री यांच्या बाबत बोलताना आपण केंद्रीय मंत्री आहात याचे भान राखावे. नाही तर राजीनामा देवून मैदानात या असे जाहीर आव्हान सासवड शहर प्रमुख अभिजित जगताप आणि युवा नेते सुरज जगताप यांनी दिले.

*ठाकरे सरकारच्या निषेधार्थ सासवला भाजपाचे उपोषण सुरु*

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाविकास आघाडी सरकारने सूडबुद्धीने अटक केलीय. या अटकेच्या निषेधार्थ राज्यसरकार विरोधात पुरंदर भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्य शासनाने राज्य घटना चे अवमान केल्या बद्दल पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टी चे वतीने आमरण उपोषण सुरू केले आहे.
सासवड (ता. पुरंदर) येथील शिवतीर्थावर नारायण राणे यांच्यावर अटक करणार आहेत. पण मला विश्वास नाही. प्रवास करत असताना मला कळलं की नारायण राणे याना आटक झाली. आहे. मनाला खूप वेदणा झाल्या. प्रत्येकाला दहशत दादागिरी आणि प्रत्येकाचा आवाज बंद करायचे काम हे सरकार करुत आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका केंद्रीय नेत्या वर घाला घातलाय म्हणजे थोडक्यात स्वातंत्र्या वर घाला घातला आहे. आणि याचा निषेध केला पाहिजे. जोपर्यंत नारायण राणेंची सुटका होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असे भाजपाचे नेते बाबाराजे जाधव यांनी सांगितले.
दहीहंडीच्या संदर्भात सर्व मीटिंग होतात. हिंदू धर्माचे सण साजरे झाले पाहिजेत पण त्यावेळी मुख्यमंत्री यांनी सांगितले की, खूप गर्दी होईल व यातून कोरोना वाढेल. पण आज त्याच्या ५०० पटीने गर्दी झाली होती. यातून मुख्यमंत्र्यांनी काय साध्य केले. नारायण राणे यांना झालेली अटक ही चुकीच्या पद्धतीने केलेली अटक आहे. याचा भाजपाच्या वतीने आम्ही निषेध करीत आहोत. असे भाजपाचे पुरंदर तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी सांगितले. या वेळी बाबासाहेब जाधवराव ,पुरंदर भा. ज. पा. अध्यक्ष गंगारामदादा जगदाळे जिल्हा भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष गिरीश जगताप, जिल्हा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्रीकांत ताम्हाणे, जालिंदर जगताप, योगेश काळे, हनुमंत साळुंखे, राजेंद्र काळे, रमेश टिळेकर, गुलाब झेंडे, रूपेश राऊत, गणेश काळे, रमेश झेंडे, योगेश काळे, तुषार पवार, संदीप जगदाळे, अविनाश झेंडे आदी उपस्तीत होते.
