कोविड मुक्त गाव अभियानाच्या पार्श्व भूमीवर पुरंदर तालुक्यात प्रशिक्षण

Share now

Advertisement

पुरंदर(प्रतिनिधी अक्षय कोलते)पुरंदर तालुक्यातील दिवे व भिवरी या दोन गावात भारतीय जैन संघटनेच्या मदतीने गाव कोरोना मुक्त करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.आता पर्येंत ३५ वर्ष समाजसेवेसाठी झोकून काम करणाऱ्या या संस्थेने आता थेट गावांना कोरोना मुक्त करण्यासाठी पाऊल उचलले आहे.
भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विध्यमाने पुणे जिल्ह्यात कोरोना मुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटना सरकारला समांतर यंत्रणा म्हणून काम करत आहे.पुरंदर तालुक्यातील वाल्हे आडाचीवाडी आणि मांडकी ही तीन गावे दोन्ही डोस देऊन लसीकरण करण्यात आली आहेत.
कोविड मुक्त गाव योजनेत सहभागी होऊन गावातील लोकांनी एकत्र येऊन गावातच काम करून आपले गाव कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावा यासाठी गावा गावांना भारतीय जैन संघटनेचे प्रतिनिधी व तालुका समन्वयक यांच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे.कोरोना आल्यापासून प्रत्येक गावात एक कोरोना नियंत्रण समिती आहे.मात्र या योजनेतून पुढे जात असताना ५समित्या बनवून प्रत्यक्ष काय काम करायचे कसे करायचे याच मार्गदर्शन केले जात आहे.

Advertisement


पुरंदर तालुक्यातील दिवे व भिवरी या दोन गावात प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी भारतीय जैन संघटनेचे प्रतिनिधी मा.श्री.मधुकर जगताप सर यांनी संस्थेच्या आता पर्येंतच्या कार्याची माहिती सांगितली.पुरंदर तालुका समन्वयक अक्षय कोलते यांनी समित्यांची नावे प्रत्येक समितीतील सदस्याचे काम या बद्दल मार्गदर्शन केले आहे.यावेळी सरपंच ,उपसरपंच,सदस्य,आशा सेविका, समितीमधील सदस्य,भारतीय जैन संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा.श्री रमेश भाऊ नवलाखा,भारतीय जैन संघटनेचे प्रतिनिधी प्रा.मा.श्री.मधुकर जगताप सर व तालुका समन्वयक अक्षय कोलते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *