भारतीय जैन संघटनेच्या मदतीने पुरंदर तालुक्यात कोरोना लसीकरण

Share now

Advertisement

पुरंदर(प्रतिनिधी अक्षय कोलते) भारतीय जैन संघटनेच्या मदतीने पुरंदर तालुक्यातील वाल्हे,आडाचीवाडी आणि मांडकी या तीन गावातील एकही डोस न घेतलेल्या 18 वर्ष वयाच्या पुढील लोकांना एकाच वेळी लसीकरण करून कोविड मुक्त गाव बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असल्याने लसीकरण पूर्ण करण्यासाठी लस पुरवठा होत नव्हता.
कोविड मुक्तगाव अभियान या योजनेत सहभागी झालेल्या पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावातील१५५४,आडाचीवाडी गावातील १९३ आणि मांडकी गावातील ८१९ एवढ्या लोकांचं दुसऱ्या डोसच लसीकरण करण्यात आले आहे.
कोरोनाचे सर्व नियम पाळून हे लसीकरण केले आहे.यावेळी या तीनही गावातील २ हजार ५५४ एवढ्या लोकांच दुसऱ्या डोसच लसीकरण केले आहे.वाल्हे गावचे लसीकरण महर्षी वाल्मिक विद्यालयात,मांडकी गावचे लसीकरण न्यू इंग्लिश विद्यालयात व आडाचीवाडी येथील शाळेत लसीकरण करण्यात आले.
महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विध्येमाने पुणे जिल्ह्यात कोविड मुक्त गाव अभियान या योजनेतून गावांना कोविड मुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केला जात आहे.कोविड मुक्त गाव अभियानातून पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील तीन गावे लसीकरण करण्यात आली आहेत.वाल्हे,आडाचीवाडी आणि मांडकी या तीन गावातील लोकांना लसीकरण करण्यात आले आहे.
वाल्हे,आडाचीवाडी आणि मांडकी या तिन्ही गावात कोरोना नियंत्रणासाठी ५ समित्या बनवण्यात आल्या आहेत.या ५ समित्यांमधील लोकांनी गावातच काम करून गावाला कोरोना मुक्त करण्यासाठी काम केले आहे.या समित्यांमुळे गावात जनजागृती सर्व्हेक्षण करत आरोग्य विभागाला लसीकरणात नावनोंदणी करण्यासाठी चांगलीच मदत झाली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *