जेजुरी नगरपालिका शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ एक सामाजिक कार्यकता करणार स्वातंत्र्यदिनी मुंडण आंदोलन
जेजुरी (प्रतिनिधी) :- बाळासाहेब धुमाळ.
शासनाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने सर्वसामान्य जनतेचे पत्रव्यवहार करताना सर्व पत्रव्यवहार, आदेश पावती इतर कोणत्याही दस्तऐवजावर टपल विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी सहीखाली स्वतःचे नाव, पदनाम, कार्यालय स्पष्ट अक्षरामध्ये लिहीणे बाबतचा शासननिर्णय पारित केलेला आहे. या कागदपत्राची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महानगर पालिका नगर पालिका नगर पंचायत वा ग्राम पंचायत यांनी काटेकोरपणे करणे बंधनकारक आहे. जेजुरी नगरपालिकेत हा कायदा पायदळी तुडवला जात असल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब लेंडे यांनी स्वातंत्र्यदिनी मुंडण आंदोलन करणार आहेत
याबाबत ऑगस्ट २०१८ ला एक पत्र दुरुस्त करून देणेसाठी जेजुरी मधील एका नागरिकाने हा शासन निर्णय जोडून अर्ज दिला होता व त्वरित त्याला ते पत्र दुरुस्त करून मिळाले देखील. परंतु त्यानंतर पुन्हा नगरपालिकेने पहिल्या सारखी पत्रे देणे सुरू केले आहे
सन २०१९ मध्ये विचारणा केली असता मुख्याधिकारी जेजुरी नगरपरिषद यांनी अशा कायद्याचा पत्राचा इथे अवलंब होत नसल्याचे मान्य करून नवीन आदेशाचे पत्र मुख्याधिकारी यांनी निर्गमित केले आहे.
परंतु पुन्हा नगरपालिकेने मागील पाचाचेच पाढे तसेच पुढे चालू ठेवले असलेने लेंडे यांनी येत्या १५ ऑगस्ट २०२१ रोजी जेजुरी नगरपालिका सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी करत नसल्याचे निषेधार्थ स्वतःचे मुंडण करून घेणार असल्याचे जाहीर केले आहे. सामाजिक कार्यकर्ते. बाळासाहेब लेंडे यांनी जिल्हाधकारी, पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण, जेजुरी पोलिस स्टेशन व जेजुरी नगरपालिका यांना यापूर्वीच निवेदन देवून या आंदोलनाची कल्पना दिली असल्याचे आमच्या प्रतिनिधीला सांगितले.