पुरंदर रोटरी क्लबच्या अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी चा पदग्रहण समारंभ संपन्न

Share now

  
सासवड ( प्रतिनिधी ) :-           पुरंदर तालुका रोटरी क्लब सन २०२१ – २०२२ च्या अध्यक्षपदी सासवड येथील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे तर सचिवपदी अभिजित बारवकर यांची निवड झाली आहे. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक ३१३१ चे २०२२ – २३ चे प्रांतपाल डॉ अनिल परमार यांच्या उपस्थतीत हा पदग्रहण समारंभ संपन्न झाला.     रोटरीच्या नवीन थीमचे अनावरण करण्यात आले. नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल उरवणे यांनी, दिवंगत लोकनेते चंदूकाका जगताप यांनी स्थापन केलेल्या या रोटरी क्लबमध्ये त्यांनी दाखवून दिलेल्या प्रमाणे सर्व सदस्यांना बरोबर घेऊन समाजोपयोगी काम करणार असल्याचे सांगितले. 
    मागील वर्षी कोरोना काळातही पुरंदर रोटरी क्लबने उत्कृष्ट काम केले, यापुढेही मोठ्या कामांचा संकल्प करून ते पुर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा असे सांगत प्रांतपाल डॉ परमार यांनी कोविड लसीकरण गरजेचे असून यासाठी रोटरीचे योगदान असणे महत्वाचे असल्याचे सांगितले. माजी अध्यक्षा डॉ अस्मिता जगताप व सचिव अॅड युवराज वारघडे यांनी, मागील वर्षात रोटरीने सासवड व जेजुरी ग्रामीण रुग्णालयांना पीपीई किट, तालुक्यातील दिड हजार कुटुंबांना किराणा किट, ८ विद्यालयांना हॅन्डवाॅश स्टेशन, वृक्षारोपण, हॅप्पी स्कूल अंतर्गत विविध कामे आदी राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच केलेले काही संकल्प कोरोनामुळे पुर्ण करता आले नाहीत, ते यापुढे पुर्ण करू असे सांगितले. 
       यावेळी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, महिलाध्यक्षा सुनिता कोलते, जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी महेश खैरे, अॅड किशोर म्हस्के, इस्माईल सय्यद, शिक्षकनेते संदीप जगताप, , वैशाली उरवणे, सुमती वारघडे यांसह नुतन सदस्य माऊली यादव, संभाजी जगताप, जावेद शेख, सचिन सोनवणे, रविंद्र जोशी, सुजित जगताप, दिलीप मोरे, सविता बरकडे, डिस्ट्रिक रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल ज्ञानदेव डोंबाळे, पंकज पटेल, पुरंदर रोटरीच्या माजी अध्यक्षा डॉ अस्मिता राजेंद्र जगताप, डॉ प्रविण जगताप, उपाध्यक्ष गुलाबराव गायकवाड, संचालक सुनील काकाा जगताप, अॅड आनंद जगताप, रफिक शेख, जीवन कड, डॉ अश्विनी जगताप, भारती गायकवाड, डॉ सुमित काकडे, डॉ विनायक बांदेकर, डॉ उमाकांत ढवळे, डॉ प्रतिभा बांदेकर, शाहजान शेख, पुनम बारवकर, संजय वाडेकर आदी उपस्थित होते. 

Advertisement

     यावेळी डॉ प्रविण जगताप यांनी स्वागत आणि सुत्रसंचलन, सचिव अभिजित बारवकर यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष गुलाब गायकवाड यांनी आभार मानले. 

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *