पुरंदर मधील देव ही नाहीत सुरक्षित शिवरी येथील यमाई मंदिरात चोरी

Share now


सासवड दि.6( प्रतिनिधी):- पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध अनेक लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र यमाई माता मंदीर मंदिरामध्ये रात्री मध्य रात्री चोरी झाल्याची घटना जेजुरी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी केतकावळे (ता पुरंदर) येथे ६ मार्च रोजी भैरवनाथ मंदिराच्या पादुकांची चोरी झाल्याची फिर्याद सासवड पोलीस स्टेशनला दाखल झाली होती. यामुळे पुरंदर तालुक्यातील देवही सुरक्षित राहिले नसल्याची चर्चा होत आहे.
        शिवरी (ता पुरंदर) येथे शुक्रवार (दि.6) रोजी पहाटे 5 .30 च्या दरम्यान चोरीचा प्रकार समोर आला आहे. मौजे शिवरी गावचे हद्दीतून यमाई देवीच्या मंदिरातून 6000 किमतीचा चांदीचा मुलामा दिलेल्या पादुका, दहा हजार किमतीचा चांदीचा मुलामा दिलेला मखर व 4000 किमतीचे एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अशा एकूण वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळवले आहे. अशी फिर्याद मंदिराचे पुजारी प्रशांत मधुकर पोरे यांनी जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये दिली. 

Advertisement

  अज्ञात चोरट्यांनी एकूण वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल माल चोरून पलायन केले. फिर्यादीने दिलेल्या माहिती वरून गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे.
     पुढील तपास जेजुरी पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली  हवालदार  मुत्तनवार हे करीत आहेत.

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *