झेडेवाडी जवळ दुचाकी व रिक्षाचा आपघात एक जखमी

Share now

सासवड (प्रतिनिधी) झेडेवाडी (ता. पुरंदर) येथील सासवड हडपसर रोडवर सवाई हॉटेल जवळ दि  २ अॅगस्ट २०२१ रोजी रात्री ८:३० दरम्यान दुचाकी व रिक्षा याच्यात आपघात होऊन देविदास भगवान झेंडे (वय ४६) राहणार झेंडेवाडी ता. पुरंदर हे जखमी झाले आसल्याची फिर्याद सुनीता देविदास झेंडे (वय ३५) यांनी आरोपी रिक्षा चालक सागर सोपान झेंडे रा- झेंडेवाडी दिवे तालुका पुरंदर जिल्हा पुणे याच्या विरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 
      सासवड पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, दिनांक २अॅगस्ट २१ रोजी रात्री ८:३० च्या दरम्यान मौजे झेंडेवाडी दिवे तालुका पुरंदर जिल्हा पुणे गावचे हद्दीत सासवड हडपसर रोडवर सवाई हॉटेल जवळ माझे पती देविदास भगवान झेंडे वय ४० वर्ष राहणार झेंडेवाडी तालुका पुरंदर हे व मी असे ज्युपिटर स्कूटर नंबर एम एच 12 पी पी 2573 वरून प्रवास करीत असताना आमची स्कूटर सासवड बाजूकडून हडपसर बाजूकडे जात असताना रिक्षा नंबर एम एच 12 क्यू  इ 5760 हिचे वरील चालक नामे सागर सोपान झेंडे राहणार झेंडेवाडी दिवे तालुका पुरंदर जिल्हा पुणे याने त्याचे ताब्यातील वाहन रिक्षा हि रस्ता क्रॉस करीत असताना वेगात चालविल्याने आमचे वाहनास उजव्या बाजूस रिक्षाची समोरून धडक बसल्याने अपघात झाला त्यामुळे माझे पती देविदास यांचे उजवे पायाचे खूभ्यास   मार लागून गंभीर दुखापत झाली व डोक्यास हातापायास किरकोळ दुखापत झाली व मला हातास व पाठीस मुक्का मार लागला आहे तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे म्हणून माझी रिक्षा चालक सागर सोपान झेंडे यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे. पुढील तपास सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तारू करीत आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *