प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीची पूर्व तयारी सत्ताधारी व विरोधक यांच्या कडून सभासदांना खूश करण्याचा प्रयत्न

Share now


सासवड (प्रतिनिधी) पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता असल्याने प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नेत्यां मध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरंदर तालुक्यातील सध्या शिक्षक हे कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे ५० % उपस्थिती दाखवित कामावर आहेत. त्यामुळे शिक्षक नेत्यांच्या कडे मोठा वेळ उपलब्ध आहे. असल्याने सभासदांच्या गाठीभेटी चा कार्यक्रम हा जोरदारपणे सुरू आहे. त्यानिमित्तानेे पतसंस्थेच्या निवडणुकीची तयारी सुुुरु असल्याचेे पाहवस मिळते

Advertisement

            काही संघटनाचे प्रतिनिधी पतसंस्थे मध्ये गौरव्यहावार  झाल्याचे सभासदांना दाखवीत आंदोलने करीत आहेत.  तर  सत्ताधारी असणाऱ्या संघटना सभासदांचे वाढदिवस साजरे करणे सभासदांच्या गाठीभेटी घेणे यावर भर दिला असल्याने निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी सत्ताधारी व विरोधक यांच्यात रस्सीखेच असल्याचे पाहावयास मिळते.

Advertisement

       यामध्ये पुरंदर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणुक ऑगस्ट ते सप्टेंबर या दरम्यान होण्याची शक्यता गृहीत धरून सर्व संघटना ह्या निवडणुकी साठी सज्ज असल्याचे पाहावयास मिळता आहेत. सभासदांना खूश करण्यासाठी सत्ताधारी संचालक मंडळा कडून नवनवीन योजना सभासदांच्या पर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये पतसंस्थेच्या माध्यमातून कर्जाची कमाल मर्यादा  २५ लाखावरून ५० लाखा पर्यंत   वाढविण्यात आली आहे. व पतसंस्थेच्या सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास १० लाखा वरून  २० लाख रुपयाची देखील मदत कुटुंबाला करण्यासाठी शिक्षक पतसंस्थेच्या संचालक मंडळा कडून प्रयत्न करण्यात आला.  

Advertisement

      पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीचा कार्यकाळ हा संपुष्टात असून सत्ताधारी संचालक मंडळाला कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे मुदत वाढ मिळाली आहे. गेल्या वर्षी शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक होणार की काय अशी शक्यता वर्तवली जात होती. या काळात सत्ताधारी व विरोधक यांच्या कडून शिक्षकांना खूश करण्यासाठी पुरस्कारांचे वितरण मोठ्या प्रमाणावर केले जात होते. यावर्षी मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेत एक आंदोलन देखील केले आहे. यामुळे या वर्षी जर पतसंस्थेची निवडणुक झाली तर सत्ताधारी व विरोधक यांच्या संघर्षाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
         पुरंदर तालुक्यामध्ये शिक्षकांच्या आनेक संघटना कार्यरत असून यामध्ये प्रामुख्याने शिक्षक संघामध्ये संभाजीराव थोरात व कै. शिवाजीराव पाटील असे दोन गट कार्यरत असल्याचे पाहावयास मिळते. त्याच बरोबर  पदवीधर शिक्षक संघटना, शिक्षक समिती मध्ये विद्यमान संचालक मंडळ व शिक्षक समिती मधील काही नाराज शिक्षक गट, एकल शिक्षक संघटना अशा प्रमुख संघटना तालुका मध्ये कार्यरत आहेत.

Advertisement

         तर विरोधकांकडून पतसंस्थे मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आंदोलने करण्यात येत आहेत. सभासदांना कशा पद्धतीने भ्रष्टाचार होत आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू असून सभासदांचे मत परिवर्तन करण्यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत.

Advertisement

        विरोधकांकडून झालेल्या आंदोलनावर नुकतीच एका शिक्षक नेत्याने सोशल मीडिया वर भावनिक पोस्ट करून हा वाद मिटवण्या साठी आवाहन केले आहे. 

Advertisement

     येणाऱ्या निवडणुकी मध्ये शिक्षक समिती, पदवीधर शिक्षक संघटना, एकल शिक्षक संघटना, कै.शिवाजीराव पाटील शिक्षक संघ,  विरुद्ध संभाजीराव थोरात शिक्षक संघ, शिक्षक समिती मधील नाराज गट अशी निवडणूक होण्याची शक्यता जाणकारां कडून शक्यता वर्तवली जात आहे. 

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *