आमदार संजय जगताप यांच्या मध्यस्थीनंतर३३ व्या दिवशी भाडवलकर कुटुंबयाचे उपोषण माघे

Share now

Advertisement

सासवड (प्रतिनिधी)  सासवड शहरामध्ये विविध ठिकाणी होणारे शॉपिंग सेंटर्स यामध्ये भांडवलकर कुटुंबीयांसाठी आरक्षित ठेवण्यासाठी येणाऱ्या जीबी च्या बैठकीत उपोषणकर्त्यांना त्यांच्या जागेच्या मोबदल्यात १० गाळे देण्याचा निर्णय घेण्याचे ठरले आहे. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा पूर्णा कृती पुतळयाची जागा निश्चित करून बसवण्याचे ठरवले आहे.  १६ आर जागा ही पालखी तळा साठी आरक्षित करण्यात आली होती त्या संदर्भातील कागदपत्रे घेऊन तहसीलदार यांच्या कडे लवकरच बैठक घेऊ व त्या संदर्भात देखील निर्णय घेऊ असे आश्वासन आमदार संजय जगताप यांनी  देऊन ते ३३ व्या दिवशी भांडवलकर कुटुंबियांचे उपोषण मागे घेण्यात आले.
      उपोषणाला तुकाराम भांडवलकर, गोपाळ भांडवलकर, बबन भांडवलकर, खोमदाम भांडवलकर, रामदास भांडवलकर, आप्पा भांडवलकर, राजेंद्र भांडवलकर, हरिचंद्र भांडवलकर, संतोष भांडवलकर, वसंत भांडवलकर, दिनेश भांडवलकर, विशाल भांडवलकर, हेमंत भांडवलकर, ओमकार भांडवलकर, ऋतिक भांडवलकर बसले होते.

Advertisement

      यावेळी नायब तहसीलदार तथा नगरपरिषदेचे प्रभारी मुख्य अधिकारी सूर्यकांत पठाडे, नगर परिषद प्रशासनाच्या वतीने मोहन चव्हाण, संदेश मागडे, सासवड नगरपालिकेचे  उपनगराध्यक्ष संजय आण्णा जगताप, अनिल उरवणे, नगरसेवक नंदकुमार जगताप, नगरसेवक संतोष गिरमे, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामोशी संघटना राज्य अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण, जय मल्हार क्रांती संघटना राज्य प्रवक्ते गंगाराम जाधव,  रविकाका खोमणे, पोपटराव खोमणे, आनंता चव्हाण,  अमृत भांडवलकर, शिवाजीराव चव्हाण, उपस्थित होते         

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *