पिसुर्टी येथील ओढ्यात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई. दोघांना अटक सुमारे २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Share now

.

Advertisement

नीरा : लोकांची वर्दळ नसलेल्या पिसुर्टी (ता.पुरंदर) येथील ओढ्यात अवैधरित्या वाळू उपसा करणऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात नीरा पोलीसांना रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास यश आले आहे. रात्रीच्या अंधारात अवैधरित्या ओढ्यातील वाळू उत्खनन करून सार्वजनिक जागेचे नुकसान केल्या प्रकरणी दोघांना अटक करून सुमारे २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुनील महाडीक यांनी दिली आहे.

Advertisement
  जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दि. ३१ रोजी रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास मौजे जेऊर गावचे हद्दीत खंडोबा जवळील जेऊर पिसुर्टीचे मध्ये असलेले ओढ्यात दिलीप निवृत्ती येळे रा.पारवडी (ता.शिरूर) व निलेश पोपटराव पवार रा.वाल्हा (ता.पुरंदर) यांनी त्यांच्याकडील हुंडाई कंपनीची कार व दोन लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा अर्जुन १ डी.आय ५५ मॉडेलचा ट्रॅक्टर त्यावर आर. टी. ओ. नंबर नसलेला ट्रॉलीसह कोणतीही शासकीय परवानगी शिवाय शासकीय जागेत विनापरवानगी वाळू उत्खनन करून सार्वजनिक जागेचे नुकसान केलच्या मजकुरचे फिर्याद पोलीस हवलदार संदीप मोकाशी (वय ५० वर्ष) यांनी दाखल केली.

नीरा पोलिसांनी रात्री २.३०च्या सुमारास जेऊर पिसुर्टी मध्ये असलेल्यात ओढ्यात १६ लाख रुपये किंमतचे महेंद्रा कंपनीचे दोन आर. टी.ओ. नंबर नसलेल ट्रॅक्टर-ट्रॉलीसह, ५ लाख रुपये किमतीची होंडाई कंपनीची आय ट्वेन्टी लाल रंगाची कार नंबर एम.एच १२ आर. टी.५११७ असा सुमरे २१ लाखांचा मुद्देमाल नीरा पोलीसांनी जप्त करत, दिलीप येळे व निलेश पवार यांनी अटक करून सासवड कोर्टात हजर केले. या दोघांवर जेजुरी पोलीस स्टेशन गु.रजि.नंबर १८६/२०२१ भा.द. वि.क.३७९, ३४ पर्यावरण संरक्षण अधिनियम १५ सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम ५ नुसार गून्हे दाखल करण्यात आले आहे. जेजुरी पोलीसी स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास गोतपागर पुढील तपास करत आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *