गुंजवणीसाठी राख ग्रामस्थांची मोर्चेबांधणी आंदोलनात घेणार मोठा सहभाग
Advertisement
सासवड (प्रतिनिधी) गुंजवणी पाईपलाईनचे आमदार संजय जगताप यांनी बंद पाडलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी राख ता. पुरंदर येथील ग्रामस्थांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. गावकऱ्यांनी प्राथमिक बैठक घेत नियोजनाला सुरवात केली असून आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे शिवसेना नेते प्रकाशराव ताटे यांनी सांगितले आहे. यावेळी उद्योजक प्रकाश ताटे, माजी सरपंच बाळासाहेब रणनवरे, सुनिल रणनवरे, वसंत रणनवरे, तंटामुक्ती अध्यक्ष मनोज रणनवरे, राहुल रणनवरे, शिवाजी माने, सोमनाथ सुर्वे, निलेश पवार, नाथा पवार, नाना पवार, संजय चाचर, आबा भोसले, दादा माने, संदीप माने, हनुमंत शिंदे, अजित रणनवरे, विक्रम रणनवरे, नवनाथ चव्हाण, पप्पू रणनवरे, प्रमोद रणनवरे, बाजीराव चव्हाण, दिपक पवार, रोहित रणनवरे, यश रणनवरे, नागेश रणनवरे, दशरथ चव्हाण, कुंडलिक चव्हाण, पांडुरंग महानवर, विठ्ठल महानवर, संदीप रणनवरे, प्रशांत ताटे, विशाल रणनवरे, विशाल पवार यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
गुंजवणीचे पाणी पुरंदर तालुक्यात लवकरात लवकर पोचावे यासाठी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी तोंडल ता. पुरंदर येथे कामास सुरवात केली. भोर आणि वेल्ह्यात यापूर्वीच काम सुरू करण्यात आले होते. ते बऱ्याच अंशी प्रगतीपथावर असताना शिवतारे यांच्या सूचनेनुसार पुरंदर तालुक्यातील कामालाही एल अँड टी कंपनीने हात घातला. दरम्यान हे काम सुरू झाल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी अधिकारी आणि कंपनीच्या अभियंत्यांना दरडावत काम बंद करण्यास भाग पाडले. मागील महिनाभरापासून हे काम बंद आहे. पुरंदर तालुक्यात यामुळे मोठा प्रक्षोभ असून शिवतारे यांनी तर थेट आंदोलनाची हाक दिली आहे.
शासनाच्या सर्व संबंधित विभागांना याबाबत नोटिसा जारी करण्यात आल्या असून इकडे तालुक्यात आंदोलनाच्या तयारीची सुरवातदेखील झाली आहे.
Advertisement