२१ व्या दिवशीही भांडवलकर कुटुंबीयांचे उपोषण सुरू.
सासवड (प्रतिनिधी) गेल्या २१ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला पुरंदरचे नायब तहसीलदार दत्तात्रेय गवारी व सूर्यकांत पठाडे नगरपरिषदेचे संदेश मांगडे, मोहन चव्हाण यांनी भेट दिली व भूसंपादन विषयीचे असणारी कागदपत्रे उपोषणकर्त्यांना देण्यात आली. मात्र दिलेल्या कागदपत्रांची उपोषण कर्त्यांचे कोणतेही समाधान न झाल्याने उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे प्रशासनाचे मात्र धांदल उडाली असल्याचे पहावयास मिळती आहे. या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे उपस्थित होते.
मातंग एकता आंदोलनाच्या वतीने माजी आमदार रमेश बागवे यांच्या मार्गदर्शनानुसार पुरंदर तालुका अध्यक्ष महादेव भोडे, व आप्पा सकट यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले.
सासवड नगरपालिकेच्या समोर भांडवलकर कुटुंबीयांच्या वतीने चक्री उपोषण सुरू आहे. या उपोषणाला आज २१ दिवस पूर्ण झाले असून या उपोषणाला शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, अभिजित जगताप, कुणाल जगताप, सुरज जगताप यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन जाहीर पाठिंबा दिला.