“या” गोळी बारातील संशयित आरोपी जेरबंद
पुरंदर (प्रतिनिधी) शुक्रवारी दोघांनी गोळीबार करत गुंड गणेश रासकर याच्या डोक्यात गोळ्या घालून त्याचा खुन केला होता. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तीन संशयितांना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून आता गोळीबार करणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या रडारवर असून लवकरच त्याच्या मोरक्या आवळण्यात पोलिसांना यश येईल अशी माहिती समोर येत आहे.
निरा (ता. पुरंदर) येथील कुख्यात गुंड गणेश रासकरचा वर शुक्रवारी १६ रोजी सायंकाळी खून झाला होता. त्याचा तपास करीत असताना जवळच्याच मित्रांनी हा खून केला आसल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्या दृष्टिकोनातून तपास करीत असताना दोन मित्रांनी गोळीबार करण्यासाठी प्रत्यक्षात सहभाग घेतला होता. मात्र या मागे अनेक सूत्रधार असण्याची शक्यता लक्षात घेत जेजुरी पोलिसा सखोल तपास करीत आहे. प्रत्यक्ष घटनेवेळी गोळीबार करणाऱ्या संशयिताला दुचाकी वरून पळवून नेणारा निखिल उर्फ गोट्या रवींद्र डावरे (रा. पाडेगाव ता खंडाळा जि सातारा) येथील या युवकाला त्याच्या घरातून सोमवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. हत्यारे पुरवणारा संकेत उर्फ गोट्या सुरेश कदम वय 25 (रा. लोणी ता. खंडाळा जि. सातारा) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गणेश रासकर पूर्वीचा अजून एक मित्र पोलिसांनच्या रडारवर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुंड गणेश रासकर गोळीबार प्रकरणात तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता लवकरच मुख्य आरोपीच्या मोरक्या आवळण्यात पोलिसांना यश येणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे.