अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पुरंदर तालुका महिला प्रवक्त्यापदी यांची नियुक्ती
सासवड (प्रतिनिधी) ः अखिल भारतीय समता परिषदेच्या पुरंदर तालुका महिला प्रवक्त्येपदी व सोशल मिडियाच्या पदी प्रमुखपदी रतन गंगाराम जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीचे पत्र अखिल भारतीय समता परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष अनिल लडकत यांनी जाहीर केले. व त्यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
सासवड (ता. पुरंदर) येथील रहिवासी रतन गंगाराम जाधव या क्रांतीज्योती सावित्री बाई फुले महिला सहकारी पतसंस्थेच्या सचिव असून त्या पुरंदर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सासवड येथेल सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची नियुक्ती करण्यात आली. असल्याचे पुरंदर तालुका अध्यक्षा निलम होले यांनी सांगितले.
यावेळी पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा स्वाती गिरमे, पुरंदर तालुका अध्यक्षा निलम होले, पुरंदर तालुका उपाध्यक्ष किसन वाघोले, आबा भोंगळे, किशोर वचकल, महेश राऊत, हनुमंत टिळेकर, उमेश म्हेत्रे, लिना वढणे, सारीका वढणे, प्रिया जगताप, उज्वला म्हेत्रे, चंद्रकांत हिवरकर, संतोष गिरमे, प्रसाद नाळे, शंकर भुजबळ, सागर जगताप, संतोष भुजबळ, संदिप राऊत, गंगाराम जाधव, अमृत भांडवलकर आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन होले यांनी केले तर आभार किशोर वचकल यांनी मानले.