पुरंदर तालुक्यात विद्युत वितरणचे शेतकर्यांना झटके

Share now

Advertisement

Advertisement

जेजुरी (प्रतिनिधी):-  पुरंदर तालुक्यातील महत्त्वाचा व्यवसाय म्हणून शेती हा आहे. शेतीसाठी लाईट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्याच बरोबर सर्वच कोरोणा लसीकरण केंद्रावर ऑनलाईन सिस्टीम द्वारे फॉर्म भरले जातात. त्यालाही लाईटच्या अडचणी मुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे  वसुलीसाठी पुरंदर तालुका एक नंबर आहे. महावितरण दुसरीकडे वीजपुरवठा खंडित करण्यासाठी अव्वल दिसत आहे.  त्यामुळे शेतकरी बांधवांच्या महावितरण बद्दल नाराजीचा सूर पहावयास मिळत आहे. तर पुरंदर तालुक्यात विद्युत वितरणचे शेतकर्यांना वरंवार झटके सहन करावे लागत आहेत. 

Advertisement

           पुरंदर च्या बहुतांशी गावात सध्या लाईटचा लपंडाव चालू आहे. प्रामुख्याने बेलसर, साकुर्डे, शिवरी, तक्रारवाडी, वाळुंज, निळूंज, खानवडी, खळद या गावांमध्ये सध्या वेळेवर विद्युत पुरवठा होत नाही.  सद्यस्थितीला खरीप हंगाम बहरात असताना शेतीपंपाची लाईट दिवसा असतानाच लाईट ची दुरुस्ती आणि इतर कामे केली जातात त्यामुळे शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत.
          शेतकरी, लघुउद्योग व्यवसायिक आणि लसीकरण केंद्रांवर  जाणर्या नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारवे लागत आहेत. तर वेळ वाय जात आहे. महावितरणने मात्र पुरंदरमध्ये शेतकऱ्यांकडे बिलाच्या वसुलीचा तगादा लावून बिल वसुली केली कोरोना काळामध्ये शेतकरी गेल्या दोन वर्षापासून अडचणीत असताना देखील महावितरण अनेकांचा विद्युत पुरवठा खंडित केला होता व पठाणी वसुली महावितरण केली परंतु शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा मात्र वेळेवर होत नसल्याचे पहावयास मिळते. 

Advertisement

       दररोज स्विच ऑपरेट करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी काम करीत असतात, परंतु हे स्वीच ऑपरेट करताना वेळेवर स्वीच ऑपरेट होत नाहीत. त्यामुळे विद्युत पुरवठा वेळेवर न येणे बहुसंख्य वेळा विद्युत पुरवठा मध्येच खंडित होणे अशा अडचणी समोर येत आहेत. 
          याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता महावितरणचे कर्मचारी कुठलीही दाद देत नाहीत. स्विच सिंगल फेज चा थ्रीफेज विद्युत पुरवठा वेळेवर जोडला जात नाही. दररोज अर्धा ते एक तास उशिरा  विद्युत पुरवठा चालू होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सहन करावी लागत आहे 

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *