धामणीच्या युवकाची भारतीय सैन्यदलात निवड
लोणी धामणी प्रतिनिधी
धामणी ( ता.आंबेगाव ) येथील कु.साई संपत विधाटे याची नुकतीच भारतीय सैन्य दलात टेक्निकल विभागात नियुक्ती झाली. एका गरीब कुटुंबातील या मुलाने अतिशय कष्टाने आणि मेहनतीने हे यश संपादन केले आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर कुटुंबाची आलेली जबाबदारी आणि परिस्थितीची जाण या सगळ्याचा विचार करून गेली तीन चार वर्षे या तरुणाने मेहनत घेऊन हे यश संपादन केले आहे.या निवडीने धामणी परिसरातून साई विधाटे यांचे कौतुक होत आहे.
धामणी ग्रामस्थांच्या वतीने साई विधाट यांचा सत्कार धामणी गावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ.रेश्माताई अजित बोऱ्हाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच त्याला पुढील कार्यासाठी आणि देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिरदाळे गावचे उपसरपंच श्री.मयुर सरडे, उद्योजक श्री.सचिनशेठ बोऱ्हाडे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.सिताराम जाधव राष्ट्रवादी युवक अध्यक्ष चेतनदादा रोडे,ख.वि.संघ शाखा अधिकारी अक्षय रोडे, भाऊसाहेब करंडे,हॉटेल अविनाश बोऱ्हाडे,कल्पेश वाघ शबाना इनामदार,गंगुबाई वाळुंज या उपस्थित होत्या.
चौकट
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा, सैन्य दल, शासकीय विभागातील नोकरी यामध्ये नैपुण्य मिळवून कुटूबांचे व गावाचे नाव उज्वल करावे
सौ रेश्माताई अजित बोऱ्हाडे सरपंच धामणी