पुरंदर तालुक्यातील या नगरसेवकाला अँटी करप्शन कडून अटक
सासवड (प्रतिनिधी) सासवड येथील माजी नगरसेवक गणेश बबनराव जगताप Ganesh Babanrao Jagtap (रा .सासवड – Saswad, जि. पुणे) व अक्षय सुभाष मारणे (Akshay Subhash Marne), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी सासवड पोलिस स्टेशन (Saswad Police Station) येथे तक्रारी अर्ज केला होता. त्यावरून गुन्हा दाखल करण्याकरीता सासवड पो.स्टे. चे पोलिस निरिक्षक घोलप (Police Inspector Gholap) यांचेकरीता अक्षय मारणे याने 3,00,000 (तीन लाख रूपये ) लाचेची मागणी केली
त्या लाचमागणीस गणेश जगताप (रा.सासवड) याने सहाय्य केले. म्हणुन लाचमागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Pune ACB Trap) पोलिस निरीक्षकाकरिता 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या मारणे आणि जगतापला अॅन्टी करप्शनकडून अटक;
जगताप पुणे जिल्ह्यातील मोठ्या राजकीय नेत्याचा जवळचा नातेवाईक पोलिस निरीक्षकाकरिता तब्बल 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या दोघांना अॅन्टी करप्शनच्या पथकाने (Pune ACB Trap) अटक केली आहे.
थेट पोलिस निरीक्षकासाठी एवढ्या मोठ्या लाचेची मागणी (Bribe For Police Inspector) झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune Bribe Case)
ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अप्पर अधीक्षक सुरज गुरव
(Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक क्रांती पवार (DySP Kranti Pawar),पो नि संदीप वऱ्हाडे, सहा पो उप नि – मुकुंद आयाचीत ,पो काॅ तावरे,चालक पो कॉ पांडुंरग माळी यांनी केली आहे.