संजय राऊत यांचा लेटर बॉम्ब आण पुणे जिल्ह्यातील हा आमदार आडचणीत येणार पुणे जिल्ह्यात खळबळ..Sanjay Raut’s letter bomb will cause this MLA of Pune district to be a problem.

Share now

Advertisement

मुंबई ः संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटरवर ट्विट करत आज राज्यभरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. दरम्यान भाजपच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे मुख्य सूत्रधार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत भिमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घ्या,

Advertisement

पुणे जिल्ह्यातील आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्या भिमा पाटस कारखान्यामध्ये ५०० कोटींचे मनी लॅंडरींग झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

      त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लेटर लिहीले असून आता याची चौकशी करा, अशी मागणी केली आहे.

Advertisement

हा कारखाना भाजप आमदार राहुल कुल यांच्या संबंधीत आहे. यामुळे आता चौकशी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

       गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या अनेकांवर आरोप करत आहेत. हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले आहेत. 

Advertisement

      सोमय्या यांच्या कार्यालयात तक्रारदार हे प्रकरण घेऊन गेले, मात्र किरीट सोमय्या या भ्रष्टाचारावर मूग गिळून गप्प बसले. जनतेच्या पैशाची प्रचंड लूटमार या कारखान्यात झाली आहे.

Advertisement

हे सर्व प्रकरण ईडी व सीबीआयच्या ताब्यात देऊन भिमा सहकारी साखर कारखान्यातील घोटाळेबाजांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *