पुरंदर मधील हा राष्ट्रीय बाजार पुढील २५ वर्ष राष्ट्रीय बाजार सुरू होणार नाही ःप्रशासन
सासवड (प्रतिनिधी) राष्ट्रीय बाजार हा अचानकपणे सुरू होणार नाही. सुरुवात ही जमिन घेण्यापासून आहे. बाजार उभा करताना शासनाच्या परवानगीने सुरुवात करावी लागते. त्यासाठी सर्वप्रथम उपबाजार सुरू करावा लागेल. या
नंतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 25 वर्षाचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर तो राष्ट्रीय बाजार किंवा आंतरराष्ट्रीय बाजार जाहीर होईल.
यासाठी ग्रामपंचायतने शिल्लक असलेली गायरान जमीन ही बाजारासाठी उपलब्ध करून द्यावी असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मधुकांत गरड यांनी केले.
दिवे (ता. पुरंदर) येथेल कातोबा मंदिरामध्ये राष्ट्रीय बाजारासाठी ७०० एकर जागा उपलब्ध करून द्यावी असे पत्र शासनाच्या वतीने देण्यात आले होते.
या पत्रावर दिवे ग्रामपंचायतने बाजार समितीचे अधिकारी व ग्रामस्थांन सोबत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी गरड बोलत होते. ते पुढे म्हणाले, भविष्याचा विचार करता येथील गायरानांमध्ये बाजार करुन लोकांना व्यवसायाची संधी मिळावी रोजगार निर्मिती व्हावी.आसे शासनाला वाटते.
यावेळी बोलताना भाजपाचे नेते बाबाराजे जाधवराव म्हणाले की शासनाने मोजणी केल्या नंतर येथे १०० एकर जागा शिल्लक आहे .
तर येथे आरटीओ, जिल्हा न्यायालयाला, समाज कल्याण, आयटीआय, निरा बाजार समिती, महावितरण व नव्यानेच गावात सुरु झालेला बाजार यांना जागा दिल्या आहेत. आता जागा फक्त ५० एकर शिल्लक आहे. यात राष्ट्रीय बाजार होणार नाही.
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत उपबाजार करणार आसताल तर तसा प्रस्ताव ग्रामपंचायतीला द्यावा. त्यावर ग्रामपंचायत विचार करेल.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने राष्ट्रीय बाजारासाठी ७०० एकर जमीन मागितली आहे.
या जमिनीला दिवे ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या ठिकाणी राष्ट्रीय बाजारासाठी जमीन उपलब्ध नाही शासनाकडून दिशाभूल केली जाते शासकीय प्रयोजनासाठी इतर संस्थांनी मागितलेल्या जागांचे ठराव दिलेले आहेत
त्यामुळे ग्रामपंचायतीला विविध प्रयोजनांसाठी लागणारी जागा देखील ठेवावी लागणार आहे ते प्रोजेक्ट ठेवून उप बाजारासाठी करण्यासाठी ग्रामपंचायत जागेचा विचार करू शकते असे सरपंच गुलाब झेंडे यांनी सांगितले.
यावेळी भाजपाचे नेते बाबाराजे जाधवराव, सरपंच गुलाब झेंडे, भारती आढाळगे, अमित झेंडे, राजू झेंडे, गणपत शितकल, बाबासाहेब शिवणे, महेंद्र काळभोर, सोमनाथ बोरकर,
संतोष कुंभारकर, प्रशांत गोते, उदयराज चोरगे, रुपेश राऊत, योगेश काळे, प्रभाकर लडकत, शोभा टिळेकर, शोभा झेंडे, शिवाजी खटाटे, संतोष झेंडे, अमर झेंडे, शरद झेंडे, अविनाश झेंडे, राजाराम काळे, उपस्थित होते.
या बैठकीचे आयोजन दिवे ग्रामपंचायतीने केले होते. सुत्रसंचालन गणपत शितकल यांनी केले तर आभार गुलाब झेडे यांनी मानले.