धामणीकर प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी
मंचर प्रतिनिधी
धामणी ( ता.आंबेगाव ) येथे ११ वर्षे पासून आम्ही धामणीकर प्रतिष्ठाण च्या वतीने जन्मतारीख व तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे.तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंतीला दरवर्षी शिवजन्मभुमी शिवनेरी ते धामणी वाजतगाजत शिवज्योत आणली जाते.
याही वर्षी गावातील अनेक शिवभक्तांनी या पायी शिवज्योत आणण्यासाठी सहभाग घेतला होता सकाळी ८ वा. गावातुन वाजतगाजत शिवज्योत मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करुन पुष्यहार अर्पण करण्यात आला.
सकाळी १०:०० ग्रामपंचायत समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन सरपंच रेश्माताई बोऱ्हाडे, उपसरपंच संतोष करंजखेले यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला व ग्रामपंचायत सदस्य अक्षयराजे विधाटे यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला.
शैलाताई जाधव यांच्या हस्ते शिवज्योतीचे पुजन करण्यात आले.
सरपंच रेश्माताई बोऱ्हाडे यांनी बोलताना सांगितले की गेले ११ वर्षे आम्ही धामणीकर प्रतिष्ठाण शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.
गेले ११ वर्षे अनेक सामाजीक उपक्रम राबवले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तुत्व व त्यांचा इतिहास चंद्र सुर्य असेपर्यंत राहिल.
या प्रसंगी माजी सरपंच अंकुश भूमकर, माजी सरपंच सागर जाधव, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नितीन जाधव,बँक ऑफ महाराष्ट्र चे मॅनेजर अंशुमन शर्मा, माजी उपसरपंच मिलिंद शेळके,
राहुल जाधव, बाळासाहेब विधाटे, राजेंद्र जाधव, गणेश जाधव, कोतवाल गणपत भांडारकर, पोपट गवंडी,
जगन विधाटे, माधव बोऱ्हाडे,राघु रणपीसे, शांताराम जाधव, संदिप गाढवे, नवनाथ विधाटे, पुष्कर गाडेकर, निकेश रोडे, सुनिल सासवडे, अभिषेक गाढवे, बापु जाधव, बाबाजी गाढवे,
दिनकर गाढवे, शिवाजी जाधव, पप्पु देशमुख, सखाराम तांबे, रामदास बढेकर, स्वप्निल बढेकर, दिनकर जाधव, संतोष जाधव, दिपक जाधव, हनुमंत सोनवणे, बाबुराव सोनवणे,
ऋषीकेश घोलप, लालु जाधव, रुपेश बढेकर, मंथन जाधव, राहुल हिवरकर, आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.