या मंदिराचा कायापालट होणार
सासवड (प्रतिनिधी) पिंपळे वन विभागाच्या हद्दीतील (ता. पुरंदर) उंच डोंगरावर असलेल्या हरेश्वर मंदिर व परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी असलेल्या ५१७.६३ लाख रुपयांचा विकास आराखड्यास मान्यता मिळाल्याची माहिती पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिली.
महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर यांची नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली.
या प्रस्तावातील क्षेत्र हे राखीव वन आहे. या क्षेत्रात पर्यटनाकरिता सुविधा निर्माण करण्याकरिता कामे करावयाची आहेत. तसेच हे क्षेत्र पुरंदरमधील महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीक्षेत्र जेजुरीचा खंडेराया,
सह्याद्री पर्वतावर यादवकालीन शिल्पकलेचा सुंदर नमुना असलेले भुलेश्वर मंदिर, शंभू महादेवाची सिद्धेश्वर, चांगावटेश्वर, संगमेश्वर, जवळार्जुन, पांडेश्वर या मंदिरानजीक आहे. तसेच धार्मिक वारसा असलेले श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर वीर,
कोडीत येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, बोपगाव येथील कानिफनाथ मंदिर, नारायणपूर येथील दत्त मंदिर, सासवड येथील संत सोपानदेव मंदिर. अशी धार्मिक स्थळे येथून जवळ असल्याने हजारो पर्यटन भाविक येथील येत असतात.
याचप्रमाणे मौजे पिंपळे वन विभागाच्या हद्दीत उंच डोंगरावर असलेले श्री शंभू महादेवाच्या हरेश्वर मंदिर व परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी आमदार संजय जगताप यांनी प्रस्ताव दिला होता