पुरंदर मध्ये क्रशरचा धुरळा
सासवड (प्रतिनिधी) पुण्यापासून जवळ असलेला पुरंदर तालुका हा स्वच्छ हवा पाणी व निसर्ग रम्य असा काही परिसर असणाऱ्या भागांमध्ये क्रेशर चालकांचे संख्या दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने पुरंदरवर धुळीचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुरंदर मध्ये स्टोन क्रेशर चालकांसाठी परवानग्या शासनाकडून दिल्या जात असल्याने सह्याद्रीच्या पर्वतरांगांपैकी असणाऱ्या पुरंदर किल्ला, पानवडी घाट, हा निसर्गरम्य परिसर असताना देखील या ठिकाणी क्रेशर चालकांचा नुसता धुराळा उडताना पाहायला मिळत आहे. तर संपूर्ण तालुक्यामध्ये तेरा ठिकाणी क्रशर सुरू आहेत.
ग्रामसभांच्या ठरावावर क्रशरचा फुफुटा
पुरंदर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी स्टोन क्रशरच्या विरोधात ग्रामसभांचे ठराव करून देखील शासन स्तरावर क्रशर चालकांना परवानगी मिळत आहेत. ग्रामसभांच्या ठरावांना काडीमात्र किंमत राहिलेली दिसत नाही.
त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या मासिक सभांनी केलेले ठराव देखील धुळकात पडले आहेत. यामुळे शासनाकडूनच ग्रामसभांच्या ठरावावर फुपुटा टाकून क्रशर चालकांना परवानगी दिल्या जात आहेत.
३ स्टोन क्रशर ग्रामस्थांच्या रेट्याने बंद
गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये पुरंदर तालुक्यातील ग्रामस्थांनी क्रोशाचारकांच्या विरुद्ध मोहीमच हाती घेतली आहे. क्रशर चालकांची असलेली मनमानी गाडून काढत उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणे आंदोलने करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली.
यामध्ये हरगुडे ग्रामपंचायतीने क्रशर चालका विरोधात मोठी मोहीम उभी करून स्टोन क्रशरचा खान पट्टा रद्द करण्यासाठी प्रस्ताव दाखल करुन परवानगी रद्द केली तर पोंढे येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पोंढे भागात सुरू असलेली क्रशर व वनविभागाच्या काही परवानगी नसल्यामुळे क्रशर चालकाला मिळालेले अकृषिक परवानगी उपविभागीय अधिकाऱ्यांनी रद्द केली आहे.
तर गुळूंचे येथे सुरू असलेल्या क्रशर चालकाविरुद्ध ग्रामस्थांनी एकत्र येऊन उपोषण केल्यानंतर सदरच्या क्रशर चालकाविरुद्ध शासनाने अहवाल तयार करून तो शासन दरबारी पाठवून क्रशर बंद करण्यासाठी आहवाल पाठवला आहे.
पुरंदरच्या विकासावर धुळीचा परिणाम
पुरंदर तालुक्यातील अंजीर, सीताफळ, डाळिंब, वाटाणा व इतर पिकांमुळे राज्यभरात पुरंदर तालुक्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पुरंदर उपसा सिंचन योजना, जानाई सिरसाई या योजनांमुळे शेतीला पाण्याची जोड मिळाल्याने येथील शेतकर्यांनी शेतीबरोबर दुग्धव्यवसायात मोठी भरारी घेतली आहे.
दरम्यान, नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, लॉजिस्टिक पार्क, गुंजवणी प्रकल्प, राष्ट्रीय बाजार, अशा नव्याने होऊ घातलेल्या प्रकल्पांमुळे तालुक्याची विकासाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. या विकासावर धुळीचा परिणाम होणार आहे यासाठी प्रशासनाकडून नवीन परवाने मंजूर करताना धोरण अवलंबणे गरजेचे आहे.
पुरंदरकरांच्या आरोग्याचा प्रश्न भविष्यात उभा राहणार
पुरंदर तालुक्याची भौगोलिक रचना डोंगराळ असल्याचा फायदा घेत तालुक्याबाहेरील भांडवलदार धनदांडग्या व्यक्तींनी खासगी खडी क्रशर प्रकल्प या भागात उभारून जमिनीतील सोन्याची लूट करण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे.
अशा प्रकलपांमुळे त्या गावच्या परिसरात पाण्याची गंभीर समस्या कायमस्वरूपी उभी राहणार आहे. याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा देखील गंभीर
प्रश्न उभा राहणार आहे.
तालुक्यात १४ ठिकाणी खानपट्टे मंजूर
पुरंदर तालुक्यामध्ये १४ ठिकाणी खानपट्टे मंजूर आहेत यापैकी १२ ठिकाणी कानपट्टीच्या माध्यमातून क्रेशर सुरू आहेत. दोन ठिकाणच्या खानपट्ट्यांच्या बाबत तक्रारी असल्याने कानपट्टी बंद आहेत
. यापैकी सुपे ६ हरगुडे १ वनपुरी १ पिंपरी खुर्द २ खेंगरेवाडी १ मांडकी १ राख २ असे खानपट्टे असून हरगुडे व गुळूंचे येथील खानपट्ट्यांना तक्रारीमुळे उत्खनास परवानग्या देण्यात आलेल्या नाहीत.
याबाबत पुरंदर च्या तहसीलदार यांच्या शी संपर्क साधला आसता संपर्क होऊ शकला नाही