खासदार सुळे यांच्या भेटीनंतर उपविभागीय अधिकाऱ्यांचा आहवाल पाहुन उपोषण माघे ःशेतकऱ्यांचा निर्णय

Share now

Advertisement

सासवड (प्रतिनिधी) : गुळूंचे कर्नलवाडी परिसरातील नियोजित खडिमशीन विरोधात सहा गावातील १७ ग्रामस्थांच आमरण उपोषण सासवड येथील दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर सोमवार पासून सुरु आहे.

Advertisement

दुसऱ्या दिवशी रात्री दोघांची तब्येत खालवल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आज तीसऱ्या दिवशी पुरंदरच्या तहसील रुपाली सरनोबत, प्रदिषण नियंत्रणाचे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत, पंचनामे केले. 

Advertisement

यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत उपोषणकर्त्यांचे समाधान झाल्यानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. उपविभागीय आधिकारी यांचा आहवाल वाचुन उपोषण माघे घेऊ आसे शेतकऱ्यांनी यावेळी सुप्रिया सुळे यांना सांगितले.

Advertisement

        सासवड (ता पुरंदर) येथील उपविभागीय अधिकारी दौंड पुरंदर यांच्या कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी

Advertisement

संबंधित अधिकाऱ्यांची संपर्क साधून लवकरच सदरचे क्रेशर बंद करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे सांगितल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण स्थगित केले.

Advertisement

    यावेळी खासदार सुळे यांच्याशी बोलताना शेतकऱ्यांनी सांगितले की  खडिमशीन शेजारील शेतात शेतकऱ्यांनी कर्ज काढून पाईपलाईन केली आहे. ती शेती धोक्यात येऊ शकते, लगत असलेल्या पॉलीहाऊसला ही धोका पोहचू शकतो,

Advertisement

विहिरींचे पाणी जाऊ शकते, पोल्ट्री नसताना पोल्ट्रीसाठी घेतलेली वीज घेतलेली गैरमार्गाने आहे, मेंढपाळांच्या चाऱ्याचा प्रश्न तसेच लगत असलेल्या बोलाईमाता प्राचीन गुहा धोक्यात येऊ शकते या कारणांमुळे खडिमशीन परिसरात नकोच अशी मागणी ग्रामस्थांनी करत आपले लेखी निवेदने होती.

Advertisement

      खडिमशीन विरोधात कर्नलवाडीचे माजी सरपंच सुधीर निगडे, लक्ष्मण वाघापूरे, भागा महानवर, पिंपरेचे माजी सरपंच दादासाहेब खरात, बाप्पू महानवर, पी.एल.निगडे, अरुण निगडे, बिरा बरकडे, कृष्णराव निगडे, अमर निगडे, हणुमंत निगडे, भगवान पवार, निलेश निगडे, दादासाहेब वाघापूरे, रोहिदास पवार, बाळू महानवर, सदाशिव महानवर हे शेतकरी व बोलाईमातेचे भक्त उपोषण करत होतो. मंगळवारी रात्री पी. एल. निगडे व बाळू महानवर यांची तब्येत खालवल्याने सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात 

Advertisement

      यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा दिगंबर दुर्गाडे, माजी सनदी अधिकारी संभाजी झेडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिक झेडे,  संतोष जगताप, बंडुकाका जगताप, युवराज जगताप, गौरीताई कुंजीर,  बबुसाहेब माहुरकर, बाळासाहेब भितांडे, शामराव भिंताडे, राहुल गिरमे, कोमल निगडे,  उपस्थित होते.

Advertisement

      कोट…… तापाने फण फणलेल्या (आजारी) तहसीलदार फिल्डवर

Advertisement

पुरंदर तालुक्यातील गुळूंचे कर्नलवाडी या परिसरातील नागरिकांचे उपोषण सुरू होते. यातच तिसऱ्या दिवशी स्वतः पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी आजारी असताना देखील फिल्डवर जाऊन पंचनामा केला. त्याचबरोबर मुलाच्या दहावीच्या पेपर साठी सुट्टीवर जाण्याचे प्रयोजन असताना सुद्धा आधी कामाला महत्त्व दिल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *