“या” संघटनेच्या वतीने महावितरण विरोधात विचार मंथन सभा संपन्न
शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण विरोधात विचार मंथन सभा संपन्न
मुख्यमंत्र्यांना विचारमंथन सभेचे निवेदन पाठवले
सासवड (प्रतिनिधी) पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना २४ तास विद्युत पुरवठा मिळावा त्याचबरोबर प्रतिहावर्स प्रमाणे महावितरण ने निश्चित केलेल्या बिलापैकी दोन तृतीयांश रक्कम अनुदान रूपाने दिले जाते.
यापैकी एक तृतीयांश शेतकऱ्यांनी भरावायचे असते. परंतु महावितरण विभागाकडून शेतकऱ्यांची पिळवणूक करून संपूर्ण रक्कम वसूल केले जाते. असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गिरमे यांनी यावेळी सांगितले.
सासवड (ता पुरंदर) येथील जयप्रकाश चौकामध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने विचार मंथन सभेचे आयोजन करण्यात आले होते. तर सदर विचार मंथन सभेचे निवेदन मुख्यमंत्री यांना महावितरणच्या माध्यमातून पाठविण्यात आले.
यावेळी दिलीप गिरमे बोलत होते. ते पुढे म्हणाले औद्योगिक क्षेत्रासाठी २४ तास विद्युत पुरवठा केला जातो. परंतु शेती उद्योगाला रात्रीचा वीजपुरवठा केला जातो तो देखील ८ तास पुरेशा दाबाने नसतो. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते तर शेती उद्योगाला लोड शेडिंग, वीज ट्रीप होणे,
ओव्हरलोड जास्त असणे, अशा समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. तर औद्योगिक क्षेत्राला महावितरण कडून कोणताही त्रास दिला जात नाही. असे गिरमे म्हणाले,
महावितरण विभागाने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत व शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा विद्युत पुरवठा खंडित करू नये. यासाठी लवकरच शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल असे पुरंदर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण यांनी सांगितले.
यावेळी पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पोमण, सासवड शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे सासवड शहर माजी अध्यक्ष महेश जगताप,
सासवड शहर भाजप उपाध्यक्ष अमोल जगताप, साहेबराव काळाणे अरुण जगताप, अशोक बोरवके, नाना वनवे, उत्तम जगताप, नाना जगताप (कोपरगावकर) उपस्थित होते.