पुरंदर या पार्टीच्या वतिने निदर्शने

Share now

Advertisement

सासवड (प्रतिनिधी)  आम आदमीचा उगमचा आंदोलनामधून झालेला आहे. आणि अशा पद्धतीच्या दडपशाहीला , अटकसत्राला आम्ही घाबरत नाही. एका सिसोदिया ना अटक कराल तर असे हजारो सिसोदिया इथे तयार होतील. असा निशाणा भाजपा सरकारवर पुरंदर तालुका आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय कड यांनी साधला

Advertisement

       सासवड (ता पुरंदर) येथील शिवतीर्थावर मनीष सिसोदिया यांच्या अटक विरोधात आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले यावेळी दत्तात्रय कड बोलत होते.

Advertisement

ते पुढे म्हणाले हा एक प्रकारे अघोषित आणीबाणीच आहे. एकीकडे जनतेचा लाखो करोडो रुपये उधळणारे अदानी सारखे लोक यांना सोडून दिले जाते. लाखो मुलांना शिक्षणाची नवीन व्यवस्था पुरवणारे ,जगभर गौरवले जाणारे दिल्लीच्या शैक्षणिक मॉडेलचे प्रणेते मणिष सिसोदिया यांना अटक करणे

Advertisement

हे भाजपच्या मनातील आम आदमी पार्टी विषयी भीतीचि लक्षणे आहे. दिल्ली,  पंजाब, गुजरात मधील आणि दिल्ली महानगरपालिकेतील यशामुळे भाजपला आम आदमी पार्टीची भीती वाटू लागलेली आहे. त्यामुळे भाजपा हुकुमशाही पद्धतीने वागत आहे. याविरुद्ध आम आदमी पार्टी रस्त्यावर संघर्ष करेल. 

Advertisement

        यावेळी संजय जगताप, गणेश चौधरी, अमोल कड, शहाजी कोलते, संदीप चौंडकर, दत्तात्रय कोलते, विनायक अंबले, गोरख अंबले उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *