पुरंदर तालुक्यातील २६४ आंगणवाड्यांना टाळे
मानधन वाढ देता का…….माननवाढ राज्य शासनाकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आक्रोश…… अंगणवाडी ताई संपावर……
अमोल बनकर
सासवड (प्रतिनिधी) पुरंदर तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत २६४ अंगणवाड्यांपैकी ७ अंगणवाडी या नियमितपणे आज उघडल्या होत्या.
अंगणवाडी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवल्यामुळे बेमुदत संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांमुळे लहान बालकांच्यात कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.ं
पुरंदर तालुक्यातील सात ७ अंगणवाड्यांच्या माध्यमातून बेलसर १(बिट) नियमित सेविका ३ मिनी मदतनिस १ तर माळशिरस १ (बिट) नियमित सेविका ४ मदतनिस २ अशा एकुण १० कर्मचाऱ्यांनी सध्या संपामध्ये सहभाग नोंदवला नसून त्यांनी आपले दैनंदिन कामकाज सुरू ठेवले आहे.
तर पुरंदर तालुक्यातील सासवड, चांबळी, बेलसर १, बेलसर २, परिंचे, माळशिरस १, माळशिरस २, वाल्हे, निरा, या बीट मध्ये नियमित सेविका २१५, मिनी अंगणवाडी सेविका ३८, मदतनीस १८३ असे एकूण ४३६ कर्मचारी सध्या तालुक्यामध्ये कार्यरत आहेत.
यापैकी संपावर नियमित सेविका २०८ मिनी सेविका ३८ मदतनीस १८० असे ४२६ कर्मचारी संपावर संपावर गेल्याने ग्रामीण भागातील लहान मुलांचे लाईफ लाईन सध्या बंद झाली आहे यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढण्याचे देखील शक्यता वर्तवली जात आहेत.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने राज्य शासनाकडे राज्य सरकारची मानधन वाढ दया, दरमहा पेन्शन लागू करा., अंगणवाडी कर्मचारी यांना ग्रॅज्युटी लागू करा, आहारातील दरवाढ करून इंधन दर वाढवावे,
अंगणवाडी कर्मचारी यांना आजारपणची रजा मंजूर करा, मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करावे, अंगणवाडी सेविकांना एवढेच मानधन मदतनीस यांना देण्यात यावे, पोषण ट्रकर मराठी करून दया,
नवीन मोबाईल तातडीने दया, आजारपनाची रजा मंजूर करा, अंगणवाडी केंद्राचे थकीत भाडे दया अशा मागण्यांचे निवेदन शासनाकडे सादर केले आहे.
कोट……..
शासनाने तातडीने आम्ही केलेल्या मागण्या सोडवाव्यात अन्यथा २८फेब्रुवारी पासून मंत्रालाय आझाद मैदान येथे विशाल मोर्चा काढणार आहे
निलेश दातखिळे, राज्य उपाध्यक्ष
कोट……..
पुरंदर तालुक्यातील २६४ अंगणवाड्यांपैकी ७ अंगणवाडी सुरू आहेत. अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या कडून निवेदन प्राप्त झाले असून सदरचे निवेदन हे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले आहे.
धनराज गिराम , प्रकल्प अधिकारी पुरंदर