भांडवलकर कुटुंबीयांच्या उपोषणातून नगरपालिकेचे कर्मचारी रिकाम्या हाताने परत माहितीःः अजित पवार यांना देणार ःः अशोक टेकवडे पुरंदर तालुका समता परिषदेचाही जाहीर पाठिंबा

Share now

Advertisement

सासवड (प्रतिनिधी) सासवड नगरपालिकेचे समोर सासवड नगरपालिकेच्या विरोधात भांडवलकर कुटुंबियांच्या वतीने चक्री उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज १३ वा दिवस असून आज दुपारी  नगरनगरपरिषदेचे कर्मचारी संदेश मांगडे व मोहन चव्हाण हे उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. परंतु नगर परिषदेकडे कोणत्याही प्रकारे समाधानकारक उत्तर देण्यासाठी नसल्याने त्यांनी रिकाम्या हातानेच जाणे पसंत केले. उपोषणकर्त्यांना त्यांनी विनंती केली की आपण हे उपोषण एक महिन्यासाठी स्थगित करावे व आम्ही कागदपत्रे शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही दोन महिन्या पुर्वी आपणास पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे अजून आपणाला वेळ देण्याची आवश्यकता नाही. तहसील कार्यालय मध्ये इतर व्यक्तींना ही कागदपत्रे दोन दिवसात उपलब्ध होतात तर आपणाला एक महिन्यासाठी वेळ कशाला हवा अशा पद्धतीच्या चर्चेदरम्यान नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना पुढे उत्तर उपलब्ध नसल्याने त्यांनी रिकाम्या हाताने जाणेच पसंत केले व उपोषण पुढे सुरूच राहणार यावर उपोषणकर्ते ठाम होते.
         सकाळी पुरंदर तालुक्याचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी भेट दिली व भांडवलकर कुटुंबीयांच्या प्रश्नांची माहिती घेऊन ही माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार यांना देणार असल्याचे यावेळी सांगितले.        काल दि १२ रोजी बाराव्या दिवशी पुरंदर तालुका आखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने भांडवलकर कुटुंबियांचा उपोषणाला पाठिंबा देण्यात आला.      यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, राजेश चव्हाण, योगेश फरतडे, बंडूकाका जगताप, भैया खाटपे, दीपक जावळे, शुभम पवार, गंगाराम जाधव, अमृत भांडवलकर, समता परिषदेचे पुरंदर तालुका अध्यक्ष चंद्रकांत गिरमे, तालुका महिला अध्यक्षा नीलम होले, तालुका उपाध्यक्ष किसन वाघुले, उपजिल्हाध्यक्षा स्वाती गिरमे, तालुका सरचिटणीस उज्वला म्हेत्रे, सासवड शहराध्यक्ष सुप्रिया जगताप, तालुका कार्याध्यक्ष संदीप राऊत, तालुका महिला उपाध्यक्ष शितल बनकर, उपोषणकर्ते आप्पा भांडवलकर व इतर उपस्थित होते.
 ……………सासवड ता पुरंदर माजी आमदार आशोक टेकवडे यानी उपोषणकर्त्यांची निवेदन स्वीकारताना राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *