“त्या” ऑडिओ क्लिपने पुरंदर मध्ये उलट सुलट चर्चा
सासवड (प्रतिनिधी) पुरंदर तालुक्यातील सासवड येथील टपरी धारक नामदेव पोटे यांची टपरी जमीन उद्होस्त करण्यात आली होती. यासंदर्भात सासवड पोलिस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर चर्मकार समाजातील नामदेव पोटे यांच्या मदतीसाठी विविध संघटना पुढे आल्या होत्या. त्याचबरोबर राज्याचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी चर्मकार समाजातील नामदेव पोटे यांची भेट घेतली होती. त्यानंतर वातावरण भलतेच तापलेले पाहावयास मिळाले.
यातच एक ऑडिओ क्लिपचि बातम्या वाऱ्यासारखे व्हायरल झाली. यामध्ये ज्यांच्याविरुद्ध नामदेव पोटे यांनी तक्रारी अर्ज दाखल केला आहे ती व्यक्ती व पत्रकार व्यक्तीमध्ये झालेल्या संभाषणा मुळे पुरंदर तालुक्यातील जनतेमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये आमदार संजय जगताप व नगरपरिषदेचे कर्मचारी संदेश मांगडे यांना विचारूनच टपरी काढल्याचे सातत्याने बोलले जात होते.
या ऑडिओ क्लिप मध्ये आमदारांचे सातत्याने नाव घेऊन त्यांना बदनाम करण्याचे ढवळे यांनी ठरवले आहे कि काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आमदार संजय जगताप गरिबांची टपरी किंवा एखादा व्यवसाय मोडकळीस आणण्यासाठी केव्हाही आदेश देणार नाहीत.
याबाबत ९ जुलै रोजी श्री. पोटे यांनी सासवड पोलिसात अर्ज दिला होता. चार दिवस गुन्हा सुद्धा पोलिसांनी दाखल केला नाही. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरली आहे. गुन्हा दाखल न केल्याने श्री. पोटे यांच्यावर दबाव आणून अर्ज मागे घ्यावा यासाठी दिवसभर जोरदार हालचाली सुरू होत्या. राजकीय दबावापोटी पोटे यांनी अर्ज मागे घेतला तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर त्यामुळे भले मोठे प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. अन्यायग्रस्त लोकांना पोलिसांनी सहकार्य केले नाही. तर त्यांच्याकडे पर्याय काय असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. ढवळे यांनी प्रसारमाध्यमात कबुली दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेणे अपेक्षित होते. पोटे यांनी अर्ज मागे घेतल्याने गुन्ह्याचे गांभीर्य कमी होत नाही.