पुरंदर मधील या ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात महिला करणार उपोषण बेकायदेशीर गाळे हस्तांतरण प्रकरण भोवणार
सासवड (प्रतिनिधी) पुरंदर तालुक्यातील माळशिरस ग्रामपंचायत ने बेकायदेशीरित्या गाळे हस्तांतरण केलेले आहेत या गाड्यांच्या संदर्भात कल्पना दीपक खैरे यांनी वारंवार ग्रामपंचायत व गटविकास अधिकारी यांना निवेदने देऊन देखील याची चौकशी न केल्याने अखेर या महिलेने आंदोलन उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून दिनांक २० फेब्रुवारी रोजी पासून उपोषण करणार असल्याचे कल्पना खैरे यांनी सांगितले.
तर ग्रामपंचायत ने दिव्यांगांचे असणाऱ्या आरक्षणाचे गाळे देखील परस्पर कार्यकर्त्यांना दिल्याने दिव्यांग संघटना देखील आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कल्पना खैरे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मी आपणाकडे १७/११/२०२२ रोजी माळशिरस येथील बेकायदेशीर देण्यात आलेल्या व्यावसायिक गाळ्यांसंदर्भात तक्रार अर्ज दिला होता.
व त्याच संदर्भात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सो यांस ही अर्ज दिला होता. त्यानंतर आपणाकडे मुख्य कार्यकारी अधिकारी सो यांनी हि २/१२/२०२२ रोजी लेखी पत्राद्वारे चौकशीचे आदेश देण्यात आले होते.
या पत्रा संदर्भात मी आपणाकडे चौकशी करण्यासाठी आले सता दोन दिवसात विस्तार अधिकारी एम एम कांबळे आपल्या गावामध्ये येऊन चौकशी करतील असे सांगितले होते.
परंतु आज पर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती आपणाकडुन मिळाली नाही. ग्रामपंचायतीकडे माहिती मागितली असता त्यांनी सदर माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही असे लेखी उत्तर दिले आहे या वरूनच हे सिद्ध होते की माळशिरसमधील 32 व्यावसायिक गाळे हे बेकायदेशीररित्या लोकांना वसिलेबाजी करून दिलेले आहेत.
कोणत्याही प्रकारची लेखी नोंद न करता गाळे खाजगी लोकांना देणे योग्य आहे का? हे गाळे धारक स्वतः व्यवसाय न करता पोट भाडेकरूंना देत आहेत व त्यांच्यावर अन्याय करत आहेत.तसेच गाळा क्र.५ या गाळा ज्या व्यक्तीला ग्रामपंचायत ने दिलेला आहे तो व्यक्ती सात वर्षांपूर्वी मयत आहेत.
त्या गाळ्याबद्दल ग्रामपंचायत बरोबर चर्चा करूनही त्याच व्यक्तीच्या नावावर आहे. ही ग्रामपंचायत मालकीचा गाळा असेल तर त्यावर वारस नोंद होऊ शकत नाही. या गाळ्याबद्दल विचारले असता त्याबद्दल काहीच सांगितले जात नाही.
एकच व्यक्ती पोट भाड्याने सात गाळे एकच व्यक्ती वापरतो हा माझ्या सारख्या महिलांवर व गरिबांवर अन्याय नाही का? मी या विषयाबद्दल आपणाकडे वेळोवेळी आले असता आपन ही मला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही.
मी या प्रश्नासंदर्भात ग्रामपंचायत, पंचायत समिती यांच्याकडे गेले आकरा महिने हेलपाटे मारत आहे.यामध्ये मला मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. तरी आपण व गाळंयाचे फेरलिलाव करण्यासाठी ग्रामपंचायतीला सूचना द्याव्यात तसेच त्यासाठी जे नियम असतील त्याप्रमाणे या गाळ्यांमध्ये महिला, अपंग, मागासवर्गीय यांना प्राध्यान्य दिले जावे.
दहा दिवसांत आपण योग्य तो निर्णय न घेतल्यास व मला न्याय न मिळाल्यास मी पंचायत समिती पुरंदर या ठिकाणी २०/२/२०२३ रोजी उपोषणासाठी बसणार आहे. या विषयावर आपण स्वत: लक्ष घालून मला न्याय द्यावा तसेच या संदर्भात योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. आशी माघणी केली आहे.