५ फेब्रुवारीला सासवड येथे माजी केद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थित होणार सत्यशोधक समाज परिषद ः Satyashodak Samaj Parishad will be attended by former Union Minister Sharad Pawar at Saswad on February 5
पत्रकार परिषदेत स्वागताध्यक्ष संभाजीराव झेंडे व रावसाहेब पवार
सासवड (वार्ताहर) सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष (150 वर्ष) झाल्याबद्दल सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा फुले यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या पुरंदर तालुक्यामध्ये ५ फेब्रुवारीला सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनामध्ये सत्यशोधक समाज परिषदचे महात्मा फुले प्रतिष्ठान व कै. सदाशिव आण्णा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वागताध्यक्ष माजी सनदी अधिकारी व ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांनी दिली.
यावेळी कै. एकनाथराव जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप ,पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते प्रा. जितेंद्र देवकर, प्राचार्य नंदकुमार सागर प्राचार्य अरुण सुळगेकर, प्राचार्य इस्माईल सय्यद, युवा नेते ऋषिकेश झेंडे,प्रा.केशव काकडे, हनुमंत झेंडे, शिक्षकनेते वसंतराव ताकवले, तानाजी झेंडे ,बाळासाहेब झेंडे, प्रा. डॉ. अरुण कोळेकर, जयंत पाणबुडे ,प्रशांत बेंगळे, दिलीप थोपटे, प्राध्यापक बालाजी परतवाड आदींसह शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते.
सत्यशोधक समाज परिषदेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुप्रिया सुळे या आहेत. प्रमुख अतिथी म्हणून पुरंदरचे आमदार संजय जगताप उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख वक्ते म्हणून महात्मा फुले प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डाॅ. बाबा आढाव, महात्मा फुले साहित्याचे अभ्यासक प्रा.हरी नरके, कोल्हापूर विद्यापीठ प्रा. प्रकाश पवार हे आहेत.
या समारंभात कै.सदाशिवआण्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ. बाबा आढाव यांना जीवनगौरव व विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी सौ. शुभांगीताई गावडे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सत्र दोन मध्ये शैक्षणिक परिसंवादस आयोजित केला आहे. शिक्षक व शिक्षण व्यवस्था( काल आज उद्या) ह्या विषयावर रात्र महाविद्यालय कोल्हापूर मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ अरुण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक परिसंवाद रंगणार आहे. यावेळी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, कला व वाणिज्य महाविद्यालय प्राचार्य अंबरनाथ ठाणे प्रा.डॉ. संदीपान नवगिरे,
मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. शिरीष लांडगे ,स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी सौ. शुभांगीताई गावडे हे या शिक्षण परिषदेत सहभागी होणार आहेत.
यावेळी माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे म्हणाले 23 सप्टेंबर 1873 रोजी बहुजन समाज व वंचित घटकातील लोकांसाठी समाज सुधारक महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज परिषदेची स्थापना केली. शिक्षणाची दारे क्षुद्रांना बंद होती.
अशावेळी शिक्षण सर्वांना मिळाले पाहिजे , समानतेची वागणूक मिळाली पाहिजे असा आग्रह महात्मा फुले यांनी धरला. याचे स्मरण नवीन पिढीला व्हावे म्हणून सत्यशोधक समता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहेत याच विचारांचे पाईक शरदचंद्रजी पवार हे उद्घाटक आहेत. व महिलांचा सन्मान म्हणून खासदार सुप्रिया सुळे या समता परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत.
रावसाहेब पवार म्हणाले मुंबई परिषदेमध्ये सासवडला सत्यशोधक समाज परिषद संपन्न व्हावी यासाठी अनेकांनी आग्रह धरला. महात्मा फुले यांनी सामाजिक चळवळ चालवत असताना यासाठी लागणारा पैसा उद्योगधंद्यांमधून निर्माण केला. सासवड हे त्याकाळी चळवळीचे मोठे केंद्र होते. या ठिकाणी शाहू ,शिवाजी, फुले, मेळे होत. त्यामध्ये अखंडाचे गायन होत असे .
समाज प्रबोधन ही परंपरा खंडित होऊ द्यायची नाही. सत्यशोधक विचाराची परंपरा खंडित होऊ द्यायची नाही. या परिषदेसाठी किमान 1000 लोक येतील. त्यांनी ह्या विचारांचा प्रसार करावा. समाजाला त्याची गरज आहे .स्त्री, क्षुद्र ,कष्टकरी यांच्या उत्थानासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
सत्यशोधक समाज परिषद यशस्वी होण्यासाठी पुरंदर मधील उच्च माध्यमिक माध्यमिक प्राथमिक शिक्षक संयोजकाची भूमिका यशस्वीपणे निभावत आहेत.
Satyashodak Samaj Parishad will be attended by former Union Minister Sharad Pawar at Saswad on February 5
Information of Sambhajirao Zende and Raosaheb Pawar at the press conference
Saswad (Correspondent) On the centenary golden jubilee year (150 years) of the establishment of Satyashodhak Samaj, Mahatma Phule Foundation of Satyashodak Samaj Parishad and Mr. Raosaheb Pawar, former chartered officer and senior socialist leader informed that it was organized in association with Sadashiv Anna Charitable Trust.
At this time Eknathrao Jagtap Foundation President Santosh Jagtap, Purandar Taluka NCP Spokesperson Prof. Jitendra Devkar, Principal Nandkumar Sagar Principal Arun Sulgekar, Principal Ismail Syed, Youth Leader Rishikesh Zende, Prof. Keshav Kakade, Hanumant Zende, Teacher Leader Vasantrao Takawale, Tanaji Zende, Balasaheb Zende, Prof. Dr. Arun Kolekar, Jayant Panbude, Prashant Bengale, Dilip Thopte, Professor Balaji Partwad and other teachers were present.
Satyashodhak Samaj Parishad will be inaugurated by Sharad Chandraji Pawar, founder of NCP. MP Supriya Sule presided over the program. Purandar MLA Sanjay Jagtap will be present as the chief guest.
Dr. Mahatma Phule Pratishthan working president as the keynote speaker. Baba Adhav, Mahatma Phule Literary Scholar Prof. Hari Narke, Kolhapur University Prof. Prakash Pawar is.
In this ceremony, on behalf of Kai Sadashivanna Charitable Trust, Dr. Baba Adhaav’s life achievement and secretary of Vivekananda Education Institute Mrs.
Shubhangitai Gawde will be honored with the Kranti Jyoti Savitribai Phule Award.
An academic seminar is organized in session two. On the subject of teachers and education system (Yesterday Today Tomorrow), Night College Kolhapur Marathi Department Head Prof. The educational seminar will be held under the chairmanship of Dr. Arun Shinde. On this occasion Savitribai Phule University Pune Marathi Department Head Prof. Dr. Prabhakar Desai, College of Arts and Commerce Principal Ambernath Thane Prof.Dr. Sandipan Navgire, Former President of Marathi Board of Studies Prof. Dr. Shirish Landge, Secretary of Swami Vivekananda Education Institute Mrs. Shubhangita Gawde will participate in this education conference.
Sambhajirao Zende, a former civil servant, said that on 23 September 1873, Mahatma Phule, a social reformer, established the Satyashodhak Samaj Parishad for the Bahujan Samaj and the people from disadvantaged groups. The doors of education were closed to the poor. In such a situation, Mahatma Phule insisted that education should be given to all and equal treatment should be given.
In order to remind the new generation of this, Satyashodak Samata Parishad has been organized and Paik Sharad Chandraji Pawar is the founder of this idea. And in honor of women, MP Supriya Sule is chairing the Samata Parishad.
Raosaheb Pawar said that many people insisted that the Saswadla Satya Shodhak Samaj Parishad should be concluded in the Mumbai Parishad. While Mahatma Phule was running a social movement, he generated the money required for this from industries. Saswad was a major center of the movement at that time. Shahu, Shivaji, Phule, fairs were held at this place. Akhanda was sung in it.
The tradition of social enlightenment should not be broken. The tradition of truth-seeking thought should not be broken. At least 1000 people will come for this conference. They should spread these thoughts. The society needs it. This conference has been organized for the upliftment of women, poor and hardworking.
Successfully played the role of Higher Secondary Secondary Primary Teacher Coordinator in Purandar for the success of Satyashodhak Samaj Parishad