आमदार संजय जगताप यांच्या “त्या” वक्तव्याचा माजी मंत्री विजय शिवतरे यांच्याकडून समाचार
भांडवलकर कुटुंबीयांच्या चक्री उपोषणाची माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी घेतली भेट
सासवड (प्रतिनिधी) सासवड (ता. पुरंदर) येथे गेल्या अकरा दिवसापासून भांडवलकर कुटुंबीय त्यांच्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची भेट विजय शिवतरे यांनी घेतली व विचारपूस केली यावेळी बोलताना विजय शिवतरे पुढे म्हणाले लोकप्रतिनिधी अधिकारी यांची यांनी कोणतीही आजपर्यंत दखल घेतलेली नाही. सासवड नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना वारंवार फोन करुन उपोषणकर्त्यांची दखल घेण्यासाठी सांगण्यात आले. परंतु नगरपरिषदेची व लोकप्रतिनिधींची साध्या दादागिरी सुरू आहे. दहा दिवसानंतर आमदार यांना अचानक काल उपोषणकर्त्यांची जाग आली. मी सर्व कागदपत्रे पाहिलेली असून या मध्ये तहसीलदारांनी रेवेन्यू चा १६ आरचा सातबारा अचानकपणे का बंद केला. या संदर्भात कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. पुणे हौसिंग बोर्डसाठी जागा अलाऊड करण्यात आली होती. मात्र त्या संदर्भातला पत्र उपलब्ध नाहीत. ताबा पावती देखील उपलब्ध नाही. गोरगरिबांच्या जमिनी लाटण्याचा कार्यक्रम प्रस्थापितांनी दबाव टाकून लावलेला आहे. त्याकाळचे भूसंपादन कसे झाले आहे याची खातरजमा नगरपरिषदेने करणे गरजेचे आहे. त्यानंतर ही सर्व फाईल शासनाकडेेेे पाठवून न त्यावर शासन योग्य तो निर्णय घेईल आमदारांनी सुप्रियाताईंना सांगून लोकसभेत हा प्रश्न मांडू असे वक्तव्य केले होते. याची खिल्ली उडवत हा विजय शिवतरे यांनी हा प्रश्न स्थानिक लेव्हलचा असून हा जास्तीत जास्त जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, नगरपरिषद कार्यालयाशी निगडीत आहे. कोणालातरी सांगून हा प्रश्न युनोमध्ये मांडू असे आमदार बरे झाले म्हणाले नाहीत अशी खिल्ली आमदार संजय जगताप यांच्या वक्तव्याची माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी उडवली यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप यादव, सासवड नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन भोंगळे, अस्मिता रणपिसे, अभिजित जगताप, अॅड. गालिब इनामदार, सचिन देशमुख, अॅड. राहुल काळे, रामदास काळे गंगाराम जाधव, अमृत भांडवलकर, आप्पा भांडवलकर, प्रशांत वांढेकर, आप्पा सकट, आदी उपस्थित होते.