निरगुडसर विद्यालयात दुर्बिनीतून अवकाश दर्शन.
मंचर प्रतिनिधी ( राजु देवडे)
अक्षय निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील पं.ज.नेहरू माध्यमिक व द.गो.वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय व आयुका पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व पालकांसाठी विद्यालयाच्या प्रांगणात अवकाश निरिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. अशी माहिती प्राचार्या सुनंदा गोरे यांनी दिली आहे.
या निमित्ताने आयुकाचे अधिकारी रूपेश लबडे यांनी विज्ञान खेळणी, तुषार पुरोहित यांनी अवकाश व दुर्बिन,महारुद्र मते यांनी दुर्बिनितून अवकाश निरीक्षण यावर व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांना सखोल माहिती सांगितली.तर सांयकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत शालेय विद्यार्थी व पालक यांनी दुर्बिनीतून अवकाश निरीक्षणाचा आनंद लुटला.
यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड.प्रदिप वळसे पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करून अवकाश निरीक्षणाचा आनंद घेतला. विद्यालयाचे विज्ञान शिक्षक बाळासाहेब येवले व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक व पर्यवेक्षक संतोष वळसे यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
दुर्बिनीतून अवकाश निरीक्षण या उपक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष रामदास वळसे पाटील,संचालक श्रीकांत पवार,सुनिल वळसे उपसरपंच आनंदराव वळसे पाटील, आशिष टेमकर, दिलीप लोखंडे व पालकांनी व ग्रामस्थांनी भेटी दिल्या. _____________
: फोटो खालील ओळी.
: निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील विद्यालयाच्या प्रागणांत दुर्बिनीतून अवकाश निरीक्षण करताना संस्थेचे अध्यक्ष ॲड.प्रदिप वळसे पाटील.सोबत विद्यार्थी. ___________________