निरगुडसर येथे प.ज.नेहरू विद्यालयात दत्त जयंती साजरी
मंचर प्रतिनिधी ( राजु देवडे)
विद्यार्थ्यांनी शालेय जिवनात अभ्यासाबरोबरच आध्यात्मा क्षेत्राकडे वळले पाहिजे.असे प्रतिपादन ह.भ.प.भरत महाराज थोरात यांनी केले.
निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील पं.ज.नेहरु माध्यामिक व द.गो.वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात दत जयंती निमित्त आयेजित केलेल्या प्रवचनरूपी सेवेत थोरात बोलत होते.यावेळी त्यानी अध्यात्म आणि विज्ञान यांचे अनेक पैलूची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय ग्रामिण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा किरण दिलीप वळसे पाटील. जेष्ठ नेते प्रतापराव वळसे पाटील,शरद बॅकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष ॲड.प्रदिप वळस पाटील,उपाध्यक्ष रामदास वळसे पाटील,
सरपंच ऊर्मिला वळसे पाटील,उपसरपंच आनंदराव वळसे पाटील,शरद पतसंस्थेचे अध्यक्ष प्रमोद वळसे पाटील,संतोष टाव्हरे,संस्थेचे संचालक प्रकाश तापकीर,सुनिल वळसे पाटील, श्रीकांत पवार, डॉ.सदानंद राऊत, प्राचार्या सुनंदा गोरे, शिक्षक व विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
: फोटो खालील ओळी.
: निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथे दत्तजयंती निमित् उपस्थित मान्यवर,ग्रामस्थ, विद्यार्थी.