माजी विद्यार्थ्यांकडून परिंचे शाळेला पंचवीस हजार रुपये देणगी
२१ वर्षांनंतर भरला वर्ग
परिंचे, ( प्रतिनिधी प्रवीण नवले) : माजी विद्यार्थ्यांनी भरवलेल्या स्नेहसंमेलनातून परिंचे (ता.पुरंदर) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात साकारण्यात येणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी पंचवीस हजार रुपये देणगी देण्यात आली आहे.
२१ वर्षांनंतर सर्व माजी विद्यार्थी एकत्र आले होते. जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेत अनेक शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन माजी विद्यार्थ्यांनी दिले असल्याचे मुख्याध्यापक महेश गोरेगावकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरवातच त्या वेळेच शिक्षकेतर कर्मचारी पोपट वाघोले यांनी घंटा वाजवून केली. माजी विद्यार्थ्यांनी राष्ट्र गीत म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले.
प्रवेशद्वारा समोर माजी विद्यार्थीनींनी सुंदर रांगोळी काढली होती.त्यावेळी असलेल्या शिक्षकांचे गुरुपूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या मनोगतात विद्यार्थ्यांकडून शालेय जीवनातील अनेक गमतीदार अनुभव व्यक्त करण्यात आले कोणत्या सरांनी शिक्षा केली ,त्या वयात आपण काय खोड्या केल्या आणि गुरूवर्यांच्या आपल्यावरील प्रेमापोटी केलेल्या शिक्षेमुळेच आपण आज विविध क्षेत्रात कार्यरत आहोत हे सांगितले
या वेळी इरफान शेख,अजय सोनवणे,लक्ष्मण नवले,सोमनाथ राऊत,पारितोष मगरे,सारिका जाधव,सागर खेंगरे,पुनम नवले,योगेश भोसले,अशोक वाघोले यांनी आपली मनोगते मोठ्या विनोदी शैलीत सादर केले
विद्यालयाचे प्राचार्य महेश गोरेगावकर यांनी सध्याची शालेय प्रगती, अजून ही शाळा गुणवत्ता टिकवून आहे पण शाळेला काय काय समस्या आहेत आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या परीने शाळेला मदत करावी असे आवाहन केले.
गुरूवर्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना केवळ मुलांना शिक्षा करणे ,हा शिक्षकाचा उद्देश नसतो तर त्या मागे ,आपला विद्यार्थी जगाच्या पाठीवर कोठेही कमी पडू नये ,त्याला अभिमानाने जगता आले पाहिजे अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तेजश्री नवले व अशोक वाघोले यांनी मानले. स्नेह भोजनाचा स्वाद घेत घेत एक मेकांशी वीस वर्षां नंतरच्या गप्पांना अगदी उधाण आले होतेएक मेकांना पुन्हा भेटण्या चे वचन देत सर्वांनी निरोप घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण नवले, महेश राऊत, सागर कुंभार, तुषार वाघोले, जितेंद्र जगताप, अभिजीत कदम ,सागर वाघोले, राहुलं वाघोले यांनी परिश्रम घेतले.
…
फोटो ओळ-परिंचे (ता.पुरंदर) येथील कर्मवीर विद्यालयात २१ वर्षांनी माजी विद्यार्थी एकत्र आले होते.