उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित.
सासवड ःपुरंदर तालुक्यातील नीरा येथील पत्रकार भरत निगडे यांना खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या पत्रकार भरत निगडे यांनी आज सोमवारी सायंकाळी आपलं उपोषण तातपूर्ते स्थगित केले आहे.
आज सोमवारी सायंकाळी चार वाजता भोर पुरंदर या उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी सबंधित पोलिसांची वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करून गुन्हे दखल करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.
निगडे यांच्या या उपोषणाला पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता त्यामुळे आज या उपोषणाला तालुक्यातील सुमारे 79 पत्रकारांनी पाठिंबा देत भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे,उपाध्यक्ष नवले,हल्लाविरोधी कृती समितीचे बाळासाहेब काळे सचिव अमोल बनकर, जेष्ठ पत्रकार दत्ता नाना भोंगळे, यांच्यासह पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.