पोलिसांची लफडी चव्हाट्यावर

Share now

Advertisement

बारामती ः या पूर्वी ही बारामतीत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे एका मुलीसोबतचे फोटो व क्लिप व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्याची तातडीने उचलबांगडी केली होती.

Advertisement

त्यावेळी ते प्रकरण पार विधानसभेपर्यंत गाजले होते. त्या वेळीही वरिष्ठांनी शेवटच्या क्षणापर्यंत संबंधित अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचीच भूमिका घेतली होती.

Advertisement

          बारामती येथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने एका महिलेला तिच्या व्हॉटसअॅपवर अश्लील – मेसेज पाठविल्यानंतर आता वरिष्ठांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

Advertisement

या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने संबंधित महिलेला तिच्या व्हॉटस अॅपवर अश्लील मेसेज टाकून तिला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचे स्क्रीनशॉट काही जणांकडे आहेत.

Advertisement

या बाबत आता वरिष्ठ पोलिस अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. या पोलीस अधिकाऱ्याच्या तावडीतून आम्हाला वाचवा आम्हाला मदत करा, अशी मागणी निनावी पत्राद्वारे एका वरिष्ठ पत्रकारांकडे करण्यात आली आहे.

Advertisement

       आता पुन्हा एकदा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे हे मेसेज पोलिस खात्याच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहेत.

Advertisement

या बाबत पोलिसांना अजून कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसली तरी पोलिसांनी उपलब्ध माहितीच्या आधारे चौकशी सुरु केलेली आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नमूद केले.

Advertisement

      या घटनेची कुणकूण लागताच संबंधित अधिकारी पंधरा दिवसांच्या रजेवर गेलेले असल्याची माहिती पुढे आली. या प्रकरणी संबंधित महिलेला या पोलिस अधिकाऱ्याने काही अश्लील इमोजीही पाठवलेले असून तिला ‘आय लव्ह यू’ तसेच तुझा होकार आहे

Advertisement

की नाही, ते एकदाच ते सांग. शेवटचं विचारतोय, असंही या मेसेजमध्ये म्हटल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे रात्री अकरानंतर हे मेसेज केले गेले आहेत.

Advertisement

        पोलिसांच्या प्रतिमेबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी नुकतेच एक परिपत्रक प्रसिद्ध केले होते, त्यात पोलिसांच्या वर्तणूकीबद्दल काही सूचना देण्यात आल्या होत्या.

Advertisement

पोलिस खात्याच्या प्रतिमेशी ही बाब संबंधित असून आता बारामतीतील या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध नेमकी काय कारवाई कली जाते याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *