पोलीसांच्या सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण

Share now

Advertisement

पुणे ः तलवारी, दंडुके, बंदुका व शरीराविरुध्द इजा करण्यासाठी वापरण्यात येणारी शस्त्रे बाळगण्यास मनाई आदेशाचे भंग करणारे सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणेबाबत पुणे शहरातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश दिले आहेत.

Advertisement

त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथक गस्त घालीत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत पोलीस शिपाई बाजीराव वीर यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि,

Advertisement

एक पांढऱ्या रंगाचा शर्ट त्यावर डिझाइन असलेला शर्ट घातलेला इसम त्याचे कब्जात लोखंडी कोयता बाळगुन लोणी स्टेशन चौकात थांबलेला आहे

Advertisement

          लोणी काळभोर पोलिसांच्या नजरेमुळे एका विवाहितेचे प्राण वाचले आहे. चारित्र्याचे संशयावरुन पत्नीस जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार लोखंडी कोयता बाळगुन निघालेल्या एका ३० वर्षीय तरुणाला लोणी काळभोर पोलिसांनी लोणी स्टेशन चौकातून ताब्यात घेतले आहे.

Advertisement

     लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत पोलीस शिपाई बाजीराव वीर यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, एक पांढऱ्या रंगाचा शर्ट त्यावर डिझाइन असलेला शर्ट घातलेला इसम त्याचे कब्जात लोखंडी कोयता बाळगुन लोणी स्टेशन चौकात थांबलेला आहे.

Advertisement

पोलिसांनी हत्यारासह त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे सर्तकतेमुळे आरोपी यांचे हातून घडणारा पुढिल अनर्थ टळला तपास पोलीस हवालदार नितीन गायकवाड करीत आहेत.

Advertisement

       सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे,

Advertisement

पोलीस हवालदार नितीन गायकवाड, संतोष होले, पोलीस नाईक श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, राजेश दराडे, बाजीराव वीर, नितेश पुंदे, मल्हार ढमढेरे, विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *