पालखी महामार्गावर अपघातात महिला ठार

Share now

Advertisement

हडपसर-सासवड पालखी महामार्गावर  पिकअप-दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाले आहेत. 

Advertisement

         याप्रकरणी पिकअपचालक नवनाथ गुलाब बडदे (वय ४२, रा. कोडित, ता. पुरंदर, जि. पुणे) यांच्यावर लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे 

Advertisement

     गौरी अशोक मोहिते (वय ३३, येरवडा, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून, नितीन विजय काळकुंडे (रा. येरवडा, पुणे) हे जखमी झाले आहेत. त्यांना हडपसरमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

Advertisement

वडकीतील पालखी विसावासमोर आज (शनिवार, दि. १ ऑक्टोबर, २०२२) सकाळी १०.४५च्या सुमारास हा अपघात झाला.

Advertisement

       पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेश भोंगळे आणि पोलीस शिपाई अभिजित टिळेकर यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर करीत आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *