ईडी सरकारने महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेणे हे पाप ःः दिगंबर दुर्गाडे

Share now

Advertisement

झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी सासवड येथे राष्ट्रवादीचे आंदोलन

Advertisement

सासवड (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे वेदांत व तैवान येथील फोक्सकॉन या सारखे प्रकल्प गुजरातला गेले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार मुळे महाराष्ट्रातील प्रकल्प हे  गुजरात मध्ये जात आहेत.

Advertisement

यामुळे राज्याला मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या जीएसटी  चा तोटा सहन करावा लागणार आहे. कर रूपातून आलेल्या पैशातून राज्यातील इतर डेव्हलपमेंट पुढे गेले असती. परंतु या ईडी सरकारने हे प्रकल्प गुजरातला देऊन मोठे पाप केले आहे. आसा घाणाघात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी केला.

Advertisement

            सासवड (ता पुरंदर) येथील शिवतीर्थ चौकावर झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी दुर्गाडी बोलत होते.

Advertisement

         यावेळी वेदांत सारखा मोठा प्रकल्प गुजरातला देऊन महाराष्ट्रातील हजारो तरुणांच्या रोजगाराच्या संधी हिरावून घेतल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे व नुकसान भरपाई मिळावी

Advertisement

लंपि रोगाच्या लस तातडीने जनावरांसाठी उपलब्ध करून द्यावी. अशा मागणीचे निवेदन तहसीलदार पुरंदर यांच्या वतीने निवडणूक नायब तहसीलदार यांना देण्यात आले.

Advertisement

       दुर्गडे पुढे म्हणाले की, पुणे जिल्ह्यामध्ये अनेक बेरोजगार तरुण आहेत या तरुणांना या मोठ्या प्रकल्पामध्ये रोजगाराच्या संधी मिळाल्या आसत्या परंतु या ईडी सरकारने तरुणांच्या रोजगारा संध्या गमावल्या  आहेत. राज्यातील तरुण  या सरकारला केव्हाही  माफ करणार नाहीत. तर  आपण संपूर्ण  तालुक्यामध्ये  याचा प्रचार व प्रसार  केला पाहिजे.

Advertisement

             यावेळी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा डॉ दिगंबर दुर्गाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विजय कोलते,

Advertisement

माजी जिल्हा परिषद सदस्य बबुसाहेब माहूरकर, महिला अध्यक्ष गौरी कुंजीर, नीता सुभागडे, मंगल म्हेत्रे, सोनाली खेडेकर, वंदना जगताप, राहुल गायकवाड, बाळासाहेब भिंताडे, शामकांत भिंंताडे, पुणे जिल्हा  युवक उपाध्यक्ष अमोल कामठे,

Advertisement

पुष्कराज जाधव, संतोष जगताप, शिवाजी कोलते, राजेंद्र धुमाळ, योगेश फरतडे, तानाजी जगताप, अतुल जगताप, संदेश पवार, वामन कामठे, संदीप जगताप, चेतन मेमाणे, युवराज जगताप, नवनाथ बोरावके, प्रकाश भालेराव, सत्यवान चाचर,  उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.