पितृपक्षाचा महिनाआहे गेले त्यांचे श्राद्ध व त्यांची चिंता करत बसू नका ः अविनाश बलकवडे

Share now

Advertisement

सासवड येथे प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांची जयंती व शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन

Advertisement

सासवड (प्रतिनिधी) ः  राज्यात मोठा राजकीय भूकंप झाल्यानंतर काही लोक शिवसेना सोडून गेले. त्यांनी त्यांचा स्वार्थ पाहिला मात्र काही लोक आजही जागेवर आहेत. आज पुरंदर मध्ये जे शिवसैनिक एकत्र येऊन प्रबोधनकार ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा करीत आहेत.

Advertisement

या निमित्ताने जमलेले शिवसैनिक हे पक्षाच्या ठाम पाठीमागे उभे असून पडत्या काळात पक्षाला उभे करण्याचे काम ते करत आहेत. हीच मोहीम सर्व राज्यात शिवसैनिकांनी वापरावी. गाव तिथे शिवसैनिक हा नारा घेऊन अभियान राबवावे असे प्रतिपादन शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा समन्वयक अविनाश बलकवडे यांनी केले.

Advertisement
महाराष्ट्र एक्सप्रेस ला सबस्क्राईब करा

महाराष्ट्र एक्सप्रेस ला सबस्क्राईब करा

Advertisement

          सासवड ( ता. पुरंदर ) येथे प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखा जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बलकवडे बोलत होते. या कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisement

        बलकवडे पुढे म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेहमी जनतेमध्ये असतात. त्यामुळे शिंदे सरकारने हिम्मत असेल तर निवडणुका घ्याव्यात शिवसेनेच्या १०० जागा निवडून येतील. या गद्दारांना जनता माफ करणार नाही. आम्हाला असे वाटले होते की, शिवतारे मंत्री झाल्यानंतर आमचे प्रश्न सुटतील. परंतु शिवतारेंना तालुक्यातील प्रश्न सोडवता आले नाहीत. त्यांनी आधी तालुक्यातील प्रश्न सोडवावेत.

Advertisement

          जे लोक पक्षाला सोडून गेले त्यांचे दुःख न बाळगता. चालू महिना हा पित्रृपंधरवढ्याचा असल्यामुळे आपण त्यांचे श्राद्ध घालून मोकळे व्हावे व दुःख करण्याचे टाळावे जेणेकरून यापुढे पक्ष बळकट होईल. यासाठी पक्ष संघटन कामावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लक्ष घालावे असे आवाहन बलकवडे यांनी केले.

Advertisement

       पुरंदर व हवेलीतील नागरिकांनी जागे होऊन येणाऱ्या निवडणुकांमध्ये या गद्दाराला धडा शिकवला पाहिजे. जर येथील जनतेला काही अडचणी आल्या तर आम्ही सदैव पुरंदरकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत असे शिवसेनेचे नेते शंकर हरपळ यांनी सांगितले.

Advertisement

         सुरुवाती पासूनच उद्धव ठाकरेंच्या सोबत काम करण्याचे आम्ही ठरवले होते. लोकांचे प्रश्न घेऊन यापुढे आम्ही काम करू. तर पुरंदर मधील अनाजी पंतांना देखील धडा शिकवू पुरंदरकरांसोबत जे गद्दारी केलेली आहे त्याचा देखील काटा पुरंदरचे स्वाभिमानी नागरिक काढल्याशिवाय राहणार नाहीत असे प्रतिपादन तालुकाप्रमुख अभिजीत जगताप यांनी केले.

Advertisement

          यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अविनाश बलकवडे, शंकर हरपळे, पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव, पुरंदरच्या तालुकाप्रमुख अभिजीत जगताप, प्रदीप धुमाळ, अनिल झगडे, सोमनाथ राणे, बापू भाडळे, सागर मोडक, अमित गुरव, अमित पवार, प्रशांत पुरंदरे, रोहिदास चव्हाण, सोमनाथ खळदकर, राजाभाऊ क्षीरसागर, शारदाब मुलानी, दीपक दळवी, राजाभाऊ कुदळे, किरण दावलकर,  संकेत जाधव, विनोद शिंदे, शांताराम जगदाळे, शिरीष पवार, नवनाथ पवार, आप्पा सकट, संजय चाचर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संकेत जाधव तर प्रास्ताविक राजाभाऊ क्षीरसागर व आभार सुदाम शिंगारे यांनी केले 

Advertisement

फोटो ः सासवड ( ता. पुरंदर ) येथे शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन करताना.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.