भिवडीचे पर्जन्यमापक पावसाच्या बचावा पासून झाडाच्या सुरक्षेला

Share now

Advertisement

सासवड (प्रतिनिधी)

Advertisement

पुरंदर तालुक्यातील तालुक्यातील पावसाचा आगार समजल्या जाणाऱ्या भिवडी मंडल क्षेत्रामध्ये तब्बल १ ४ गावांसाठी २ पर्जन्यमापक यंत्र असून, पाऊस मोजण्याची शासनाची यंत्रणा म्हणजे अजब कामकाज असल्याचे चित्र आहे.

Advertisement

यातच या पर्जन्यमापकाच्या वरती झाडाचा विळखा आहे. हे पर्जन्यमापक यंत्र झाडाखाली पावसाच्या बचावासाठी ठेवलेले आहे का असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. व  पर्जन्यमापकाच्या गेटला साधे कुलूपही लावलेले नसते. त्यामुळे हे पर्जन्यमापक किती सुरक्षित आहे. असा प्रश्न देखील नागरिक विचारत आहेत.

Advertisement

   भिवडी मंडल विभागामध्ये गराडे, सोमर्डी, केतकावळे, वारवडी, कोडीत खु, कोंडीत बु, देवडी, भिवडी, पूरपोखर, सुपे, केतकावळे,  ही गावे येतात परंतु या भागातील पूर पोखरी या ठिकाणी एक पर्जन्यमापक बसवले असून या पर्जन्यमापकाची आकडेवारी भिवडी मंडल साठी पाठवली जाते.

Advertisement

तर येथील भिवडी राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकामध्ये बसवलेल्या पर्जन्यमापकाची आकडेवारी पाठवली जात नाही. असे मंडलाधिकारी सचिन मोरे यांनी सांगितले. 

Advertisement

    पुरंदर तालुक्यातील प्रत्येक मंडलची येणारी आकडेवारी या आकडेवारीवरूनच जिल्ह्यातील पर्जन्यमापन निश्चित केले जाते. त्यामुळे तालुक्याच्या महसूल विभागांचे पर्जन्यमापकाचे मोजमापही ‘रामभरोसेच’ असल्याचे चित्र पहावयास मिळते. या गावांचे भवितव्य अतिवृष्टी किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर अंधारातच राहणार आहे.

Advertisement

          तालुक्यात सासवड, जेजुरी, राजेवाडी, वाल्हे, परिंचे, कुंभारवळण, भिवडी आसे ७ महसूल मंडल आहेत.या महसूल मंडलाचा पाऊस यापूर्वी पर्जन्यमापक यंत्रात पडलेल्या पावसाच्या पाण्यावरून निश्चित केला जात आहे. महसूल अथवा कृषी विभागाचे कर्मचारी याची नोंद घेऊन वरिष्ठ कार्यालयात पाठवीत.          

Advertisement

           पावसाची मोजणी शेतकऱ्यांच्या दृष्टीने जितकी महत्त्वाचा आहे. तितकीच ति शासनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. पावसाच्या आकडेवारीवरून पैसेवारी ठरविली जाते. त्याआधारे दुष्काळ निश्चित होते.

Advertisement

पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक यंत्राचा वापर केला जातो. लिटर प्रतिचौरस मीटर किंवा मिलिमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने पर्जन्यमापकी अतिशय महत्त्वाचे आहे. 

Advertisement

          भिवडी (ता पुरंदर) येथील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाच्या आवारातील पर्जन्यमापकाच्या सभावताली माजलेले गवत व त्यावरती असलेला झाडांचा वेळखा

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *