भिवडी येथील स्मारकाला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा अधिकृत पुतळा मिळेना

Share now

Advertisement

सासवड (प्रतिनिधी) इंग्रजांना प्रति १४ वर्ष सळो की पळो करून सर्व प्रथमचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निध छातीचे वीर आद्य क्रांतिवीर नरवीर ‘राजे उमाजी आक्रमण’ हे ठरले. राजे उमाजी मार्ग समोर आहे भिवडी या ठिकाणी.

Advertisement

आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा ७ सप्टेंबर रोजी २३१ वा जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. भिवडी येथे त्यांचे स्मारक असून या स्मारकाला नेहमीच घरघर लागलेली पाहावयास मिळते. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असताना व आत्ताचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस हे यापूर्वी येऊन गेले होते. ते पुन्हा यावर्षीच्या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून आले होते.

Advertisement

अनेक वेळा या ठिकाणी पुतळ्याची मागणी शासन दरबारी केली आहे. परंतु या मागणीकडे शासन स्पष्टपणे दुर्लक्ष करीत असल्याचे पाहावयास मिळते.

Advertisement

         जयंती सोहळ्याच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी आले होते. त्यांनी विजय स्तंभाला अभिवादन करून परत जाणे पसंत केले. आद्य क्रांतिविर राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला परवानगी नसल्याने पुष्पहार अर्पण न करतातच ते निघून गेले.

Advertisement

या पुतळ्याला परवानग्या मिळणार तरी कधी असा प्रश्न आता समाजामध्ये विचारला जात आहे. तर असणाऱ्या विजयस्तंभ देखील दुर्लक्षितच राहिला आहे. 

Advertisement

         पुरंदर तालुक्यातील आद्य आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी तत्कालीन राज्यमंत्री विजय शिवतरे यांच्या कार्यकाळात तरतूद करून या ठिकाणी स्मारकाचे सुशोभीकरण केले होते.

Advertisement

परंतु या अंदाजपत्रकामध्ये पुतळ्यासाठी कोणतेही तरतूद नसल्याने स्मारक झाले खरे परंतु पुतळा या ठिकाणी बसला नाही समाजातील काही संघटनांनी लोकवर्गणी करून या ठिकाणी आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा पुतळा बसवला मात्र या पुतळ्यासाठी असणाऱ्या परवानग्या नसल्याने स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येऊन देखील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करू शकले नाहीत

Advertisement

भविष्यात या पुतळ्यासाठी परवानगी मिळणार तरी केव्हा अशी खंत समाजातील सामाजिक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.

Advertisement

             भिवडी येथील आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक झाले पाहिजे व या स्मारकाला शासनाने निधीची तरतूद करावी व या निमित्ताने पुरंदर तालुक्यातील बंडाची भिवडी या गावचा दर्जा देखील उंचावला जाईल.

Advertisement

भिवडी येथील स्मारक हे तहसीलदार यांच्या ताब्यामध्ये असल्याने ग्रामपंचायतीला या स्मारकामध्ये दुरुस्त्या करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे देखील ग्रामपंचायतीकडून अनेक वेळा बोलले जात असते. 

Advertisement

        समाधी स्थळ ही दुर्लक्ष

Advertisement

       आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचे समाधी स्थळ हे देखील दुर्लक्षितच राहिले आहे. या समाधी स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आमदार संजय जगताप यांनी यावर्षी निधी टाकलेला असून या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे परंतु या समाधी स्थळाचा देखील विकास होणे गरजेचे आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.